गुढीपाडव्यावर दु:खाचे सावट, गावकरी शोकाकुल!
By Admin | Updated: March 22, 2015 01:37 IST2015-03-22T01:37:55+5:302015-03-22T01:37:55+5:30
शहीद झालेल्या सूरज मोहिते यांचे मूळगाव असणाऱ्या सिद्धनाथवाडी (सरताळे, ता. जावळी) येथे ग्रामस्थांनी एकही गुढी न उभारता आबा व मोहितेंना आदरांजली वाहिली.

गुढीपाडव्यावर दु:खाचे सावट, गावकरी शोकाकुल!
तासगाव/ वाई : ज्या गावाची ओळख आर. आर. पाटील तथा आबांमुळे राज्यभर झाली, त्या ‘अंजनी’त आणि दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या सूरज मोहिते यांचे मूळगाव असणाऱ्या सिद्धनाथवाडी (सरताळे, ता. जावळी) येथे ग्रामस्थांनी एकही गुढी न उभारता आबा व मोहितेंना आदरांजली वाहिली.
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे १६ फेब्रुवारीला निधन झाले. यातून हे गाव अद्याप सावरलेले नाही. येथील घराघरात वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन आबांना गृहीत धरूनच केले जायचे, आबाही प्रत्येक कुटुंबांत रमायचे, पण आता आबाच नाहीत, त्यामुळे वर्षभर सणवार, उत्सव, कार्यक्रम करायचे नाहीत, असे जणू गावाने ठरवूनच टाकले आहे. गुढी न उभारता ग्रामस्थांनी आबांना आदरांजली वाहिली. (वार्ताहर)
सिद्धनाथवाडीवर दुखवटा
च्जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या चौकीवर शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवान सूरज मोहिते यांना वीरमरण आले होते. जवान मोहिते यांचे पार्थिव विशेष विमानाने रविवारी पुण्यात आणण्यात येणार आहे़ तेथून लष्करी वाहनातून पार्थिव त्यांच्या मूळ गावी गणेशवाडी (सरताळे, ता. जावळी) येथे आणून नंतर ते सिद्धनाथवाडीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे़
च्सध्या वाई शहरात शोकाकूल वातावरण आहे. सिद्धनाथवाडी व गणेशवाडी (सरताळे) येथे पाडव्यादिवशी गुढी न उभारून दुखवटा पाळण्यात आला़ वाईशहर व परिसरातील गुढीपाडव्यानिमित्त घेण्यात येणारे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले़ तसेच वाईतील नागरिकांनी उस्फूर्तपणे बंदही पाळला.
नाशिक : सोसायटीचे साडेसहा लाख रुपये कर्ज काढले, तीन लाखांचा इतर खर्च करीत शिमला मिरचीसाठी साडेनऊ लाख अडकविले; पण निसर्गाने मांडलेल्या खेळाने लाखाचे बारा हजार झाले...एका तासात सारी स्वप्ने अक्षरश: धुऊन नेली, सांगा साहेब कर्ज क सं फेडायचं, तोंडातला घास हिरावून गेल्याने काहीही गोड लागत नाही... अख्खी बाग आडवी झाली.. तुन्हीच सांगा, कसा साजरा करू आम्ही पाडवा... गारपीटग्रस्त निफाड तालुक्यातील बळीराजाची ही व्यथा आहे. येथे ना गुढी उभारली गेली. ना पाडव्याचा गोडवा होता.
गारपीट व अवकाळीनं उद्ध्वस्त झालेल्या निफाड तालुक्यातील उगाव, वनसगाव, सारोळे या गावांची शनिवारी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी पाहणी करत नुकसानीची माहिती जाणून घेत शेतकऱ्यांचे सांत्वन केले. त्यावेळी शेतकऱ्यांच्या मुखातून शब्दही फुटत नव्हते. (प्रतिनिधी)
केंद्रीय कृषिमंत्र्यांचा नाशिक दौरा
साहेब, वर्षभर जीव लाऊन द्राक्षबागा जोपासल्या. परंतु गारपिटीने सर्व पुरतं बिघडविलं, अशी हतबलता द्राक्ष उत्पादकांनी व्यक्त केली.