शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री गिरिश महाजन, दादा भुसे यांच्या समजुतीनंतर रास्ता रोको मागे; मृतांच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 14:08 IST

नाशिक : मालेगाव तालुक्यातील अजंग-दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहिरी तलावाच्या बंधार्‍यावरून शेतमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर मंगळवारी संध्याकाळी ट्रॉलीसह तलावात उलटला. या दुर्घटनेत वडेल गावातील सात महिलांचा मृत्यू झाला असून पंधराहून अधिक महिला-पुरूष गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर अजंग व वडेल या दोन्ही गावे शोकसागरात बुडाली असून गावकर्‍यामध्ये संताप व्यक्त होत आहे. पालकमंत्री ...

ठळक मुद्दे वडेल गावातील सात महिलांना प्राण गमवावे लागले मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सर्व जखमींचा खर्च शासन उचलणार पालकमंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे यांनी दोन्ही गावांना सकाळी भेट

नाशिक : मालेगाव तालुक्यातील अजंग-दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहिरी तलावाच्या बंधार्‍यावरून शेतमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर मंगळवारी संध्याकाळी ट्रॉलीसह तलावात उलटला. या दुर्घटनेत वडेल गावातील सात महिलांचा मृत्यू झाला असून पंधराहून अधिक महिला-पुरूष गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर अजंग व वडेल या दोन्ही गावे शोकसागरात बुडाली असून गावकर्‍यामध्ये संताप व्यक्त होत आहे. पालकमंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे यांनी दोन्ही गावांना आज सकाळी भेट देत रास्ता रोको करणार्‍या रहिवाशांची समजूत काढून मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर रहिवाशांनी आंदोलन मागे घेत महिलांचे मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली.दरम्यान, महाजन व भुसे यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्याचे जाहीर केले. तसेच सर्व जखमींचा खर्च शासन उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर नागरिकांचा रोष कमी झाला व महिलांचे मृतदेह ताब्यात घेण्यास तयारी दर्शविली.

सामान्य रुग्णालयातून नातेवाईकांसह नागरीकांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली आहे. वडेल व अजंग या दोन्ही गावांवर शोकाकूल व भावूक गंभीर वातावरण पसरले पसरले आहे. आर्थिकदृष्ट्या सर्व जखमी व मृत्यूमुखी पडलेल्या महिलांच्या कुटुंबियांची परिस्थिती हलाखीची असून मोलमजूरी करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते. अचानकपणे काळाने घाला घातल्याने वडेल गावातील सात महिलांना प्राण गमवावे लागले तर पंधराहून अधिक मजूर जखमी झाले आहेत.या घटनेने नाशिक जिल्ह्यासह संपुर्ण राज्य हादरले आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात