घोड्यावरही ‘जीएसटी’चा भार!, लग्नसमारंभ आणि मिरवणुकीतील घोडेही महागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 05:27 IST2017-08-28T05:27:39+5:302017-08-28T05:27:49+5:30
एकेकाळी राजा-महाराजांची तसेच घोडे शौकीनांची ‘शान की सवारी’ असलेली घोडेस्वारी आता महागणार असून आता घोड्यावरही १८ टक्के जीएसटीचा भार आला आहे.

घोड्यावरही ‘जीएसटी’चा भार!, लग्नसमारंभ आणि मिरवणुकीतील घोडेही महागणार
संजय खांडेकर
अकोला : एकेकाळी राजा-महाराजांची तसेच घोडे शौकीनांची ‘शान की सवारी’ असलेली घोडेस्वारी आता महागणार असून आता घोड्यावरही १८ टक्के जीएसटीचा भार आला आहे.
पशुसंवर्धनाच्या श्रेणीतून घोड्याला वगळून याच्या खरेदीव्यवहारावर १८ टक्के जीएसटी लावण्यात आल्याने राज्यातील घोडाबाजारात मंदीचे सावट आले आहे. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम जिल्ह्यापासून ग्रामीण भागापर्यंत जाणवत आहे. घोड्यांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने तसेच त्यांच्या देखभालीचा खर्च वाढल्याने अप्रत्यक्षपणे वरात, लग्नसमारंभ आणि मिरवणुकीत भाड्याने मिळणारे घोडेही महागणार आहेत.
राज्यातील घोडा खरेदी-विक्रीची बाजारपेठ असलेल्या अकलूज, सारंगखेडा, माळेगाव घोडे आणि शिरपूर चोपडा या चारही ठिकाणच्या मुख्य घोडेबाजारांमध्ये सध्या कमालीचे मंदीचे सावट आहे. त्यामुळे इतर पशुसंवर्धनाप्रमाणे घोड्यांनाही त्यात मोजले जावे आणि घोडे बाजारावरील जीएसटी रद्द करण्यात यावा, अशी मागणी राज्यस्तरीय संघटनेने जीएसटी परिषदेकडे केली आहे.