शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सांगली जिल्ह्यात १३०० कोटींचा जीएसटी; देश, राज्याच्या तुलनेत अधिक वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 16:36 IST

कारवाई मोहीम सुरूच

सांगली : जिल्ह्यात उद्योग, व्यवसायातील वाढीचा आलेख आता जीएसटी महसुलातून स्पष्टपणे दिसत आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या ११ महिन्यांत १ हजार ३०० कोटींचा जीएसटी जमा झाला असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १५ टक्के वाढ नोंदली गेली आहे.मागील आर्थिक वर्षात एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ मध्ये १ हजार १३५ कोटी जीएसटी जमा झाला होता. यंदाच्या आर्थिक वर्षात त्याच कालावधीत १ हजार ३०० कोटी इतका जीएसटी जमा झाला आहे. म्हणजेच यंदा १६५ कोटींची भर पडत १५ टक्के वाढ नोंदली गेली आहे.देशात सध्या १ कोटी ४९ लाख ३४ हजार ३७९ करदाते आहेत. मागील आर्थिक वर्षात एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ मध्ये देशाचे जीएसटीचे कलेक्शन १८ लाख ३९ हजार ७६६ कोटी होते. एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ चा महसूल २० लाख १२ हजार ७२० कोटी इतका झाला. या ११ महिन्यांत देशाच्या जीएसटी महसुलात ९.४ टक्के वाढ दिसते.महाराष्ट्राचा विचार करता राज्यात सध्या १७ लाख ९५ हजार १९३ करदाते आहेत. मागील आर्थिक वर्षात एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ मध्ये जीएसटीचा एकूण महसूल २ लाख ९५ हजार ४५७ कोटी होता. चालू आर्थिक वर्षात त्याच काळात ३ लाख २८ हजार ३२१ कोटी जीएसटी जमा झाला. ही वाढ ११.१२ टक्के नोंदली गेली.

कारवाई मोहीम सुरूचकरचोरीविरोधी विशेषतः बनावट देयके देणाऱ्यांवर नियमित कारवाई, बनावट नोंदणीधारकांची शोधमोहीम या गोष्टी जीएसटी संकलन वाढीत योगदान देत आहेत.

देश, राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात अधिक वाढजिल्ह्यात ३१ हजार ८९५ करदाते आहेत. जिल्ह्यात महसूल वाढ ११ महिन्यांतील महसूल वाढ १५ टक्के असून ही देशाच्या तसेच राज्याच्या वाढीच्या तुलनेत सातत्याने चांगलीच दिसत आहे. तसेच केंद्र व राज्य जीएसटी विभागाने लेखापरीक्षण तसेच कर चुकवेगिरी विरोधी कारवाया, कर निर्धारण, विवरण पत्रे छाननी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा वापर विभागाने वाढवल्याने त्याचाही सकारात्मक परिणाम या वाढीवर दिसून येत आहे.

टॅग्स :SangliसांगलीGSTजीएसटी