शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 05:42 IST

राज्यात कोरोनाचे ७४,८६० रुग्ण : आतापर्यंत २,५८७ बळी; दिवसभरात २ हजार ५६० रुग्ण, तर १२२ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात १ मे ते १ जून कालावधीत राज्यातील रुग्णवाढीचा वेग क्रमश: कमी होत असून १ जून रोजी तो देशाच्या सरासरीपेक्षा ४.७४ टक्केदेखील कमी झालेला आहे, हे स्पष्ट झाले आहे. यावरून राज्यातील कोविड-१९ प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आता राज्यात रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर आल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.

राज्यात बुधवारी दिवसभरात कोरोनाच्या २ हजार ५६० रुग्णांची तर १२२ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ३९ हजार ९३५ अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७४ हजार ८६० झाली असून मृतांचा आकडा २ हजार ५८७ झाले आहेत. दिवसभरात ९९६ रुग्ण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३२ हजार ३२९ आहे.

राज्यात नोंद झालेल्या १२२ मृत्यूंमध्ये मुंबई ४९, उल्हासनगर ३, नवी मुंबई ३, ठाणे २, मीरा भार्इंदर १, वसईविरार १, भिवंडी १, धुळे ४, जळगाव २, अहमदनगर १, नंदुरबार १, पुणे १९, सोलापूर १०, कोल्हापूर २, औरंगाबाद मनपा १६, जालना १, उस्मानाबाद १, अकोला २ आणि उत्तर प्रदेश, बिहार व प. बंगाल येथील प्रत्येकी एका स्थलांतरित व्यक्तीचा समावेश आहे. १२२ मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ५१ महिला आहेत. यात ६९ रुग्ण ६०पेक्षा अधिक वयोगटातील आहेत. तर ४६ रुग्ण ४० ते ५९ वयोगटातील आहेत. तर सात जण ४० वर्षांखालील आहे. या १२२ रुग्णांपैकी ८८ जणांमध्ये ७२ टक्के अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.१८ टक्के आहे, तर मृत्यूदर ३.४५ टक्के आहे. सध्या राज्यात ५ लाख ७१ हजार ९१५ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांमध्ये ७१ हजार ९१२ खाटा उपलब्ध असून ३३ हजार ६७४ लोक अलगीकरणात आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस