८० वर्षांवरील निवृत्तीवेतनधारकांना वाढ
By Admin | Updated: June 2, 2014 06:37 IST2014-06-02T06:37:18+5:302014-06-02T06:37:18+5:30
८० वर्षांवरील निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या मूळ निवृत्तीवेतनात १ एप्रिल २०१४ पासून १० टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

८० वर्षांवरील निवृत्तीवेतनधारकांना वाढ
मुंबई : ८० वर्षांवरील निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या मूळ निवृत्तीवेतनात १ एप्रिल २०१४ पासून १० टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य शासन, जिल्हा परिषद तसेच कृषी आणि अन्य शैक्षणिक संस्थांतून निवृत्त झालेल्या सुमारे एक लाख सेवानिवृत्तीधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. संघटनांकडून वारंवार याबाबत मागणी करण्यात येत होती. सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने ही वाढ केली असूण त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर दर महिन्याला १० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. वाढती महागाई व वृद्धत्वामुळे आजारपणावर होणारा खर्च लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य शासनाचे अधिकारी व कर्मचार्यांना १ एप्रिल पासून वाढीव वाहतूक भत्ता देण्याचा, तसेच अंध, अपंग कर्मचार्यांचा वाहतूक भत्ता दुप्पट केला आहे. ५४०० रुपये अथवा अधिक गे्रड पे असणार्या कार्मचार्यांना अ-१ व अ वर्गातील शहरांसाठी २ हजार ४०० रूपये तर इतर ठिकाणांसाठी दरमहा १ हजार २०० रूपये तर ४४०० ५४०० रुपये ग्रेड पे असणार्या कर्मचार्यांना अ-१ व अ वर्ग शहरांसाठी १ हजार २०० रुपये तर इतर ठिकाणांसाठी ६०० रुपये व ४४०० पेक्षा कमी ग्रेड पे असणार्या कर्मचार्यांना सर्व शहरांसाठी ४०० रुपये असा वाहतूक भत्ता देण्यात येईल. तसेच अंध, अस्थिव्यंग आणि पाठीच्या कण्याच्या विकाराने पीडित असणार्या अधिकारी व कर्मचार्यांना दुप्पट वाहतूक भत्ता दिला जाईल. ५४०० रुपये किंवा त्याहून अधिक ग्रेड पे असलेल्या कर्मचार्यांना अ-१ व अ वर्ग शहरांसाठी ४ हजार८०० रुपये तर इतर ठिकाणांसाठी २ हजार ४०० रुपये दरमहा देण्यात येतील. ग्रेड पे ४४०० ते ५४०० रुपये असणार्या कर्मचार्यांना अ-१ व अ शहरांसाठी २ हजार ४०० रुपये तर इतर ठिकाणांसाठी २००० रुपये व ४४०० पेक्षा कमी ग्रेड पे असणार्यांना सर्व शहरांसाठी २००० रूपये वाहतूक भत्ता देण्यात येईल.