आंब्याच्या भावात वाढ
By Admin | Updated: May 9, 2016 00:46 IST2016-05-09T00:46:48+5:302016-05-09T00:46:48+5:30
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी येथील फळबाजारात रत्नागिरी हापूसची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली असली, तरी अक्षय तृतीयेनिमित्त लागणारा तयार आंबा बाजारात उपलब्ध नाही

आंब्याच्या भावात वाढ
पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी येथील फळबाजारात रत्नागिरी हापूसची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली असली, तरी अक्षय तृतीयेनिमित्त लागणारा तयार आंबा बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे रत्नागिरी हापूसच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पेटीमागे ५०० रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, अक्षयतृतीयेनंतर काही दिवसांनी रत्नागिरी हापूसचे दर पुन्हा खाली येण्याची शक्यता आंब्याच्या व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
गुलटेकडी येथील फळ बाजारात रविवारी रत्नागिरी हापूसची सुमारे ४ ते ५ हजार पेटी इतकी आवक असून कर्नाटक हापूसची सुमारे ३० ते ३५ हजार पेटी इतकी आवक झाली. कच्च्या हापूसच्या ४ ते ७ डझनाच्या पेटीला १२०० ते २५०० रुपये तर तयार आंब्याच्या ४ ते ७ डझनाच्या पेटीला १२०० ते ३००० रुपये दर मिळत
आहे. कर्नाटक कच्च्या हापूसच्या ३ ते ५
डझनाच्या पेटीस ६०० ते १२०० तर तयार
हापूसच्या ३ ते ५ डझनाच्या पेटीस १००० ते १६०० रुपये दर मिळत आहे. पायरी कच्चा ३ ते ५ डझनाच्या पेटीस ५०० ते ८०० रुपये तर पायरी तयार ३ ते ५ डझनाच्या पेटीस ७०० ते १०००
रुपये दर मिळत आहे. लालबाग कच्चा प्रतिकिलोे २५ ते ३५ तर तयार आंब्यास ३० ते ४० रुपये
दर मिळत आहे,असे आंब्याचे व्यापारी अरविंद
मोरे, युवराज काची, रोहन उरसळ, करण जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)