व्हॉटस् अ‍ॅपवरील ग्रुप अ‍ॅडमिनला अटक

By Admin | Updated: June 18, 2014 11:14 IST2014-06-18T05:01:18+5:302014-06-18T11:14:49+5:30

फेसबुक तसेच ‘व्हॉटस् अ‍ॅप’ ग्रुप तयार करून त्यावर माहिती, मनोरंजन तर अनेक वेळा बीभत्स चित्र, मजकूर व व्हिडिओ पाठविण्याचे तरुणाईमध्ये मोठे फॅड आलेले आहे

Group admin arrested on the Whatsapp app | व्हॉटस् अ‍ॅपवरील ग्रुप अ‍ॅडमिनला अटक

व्हॉटस् अ‍ॅपवरील ग्रुप अ‍ॅडमिनला अटक

औरंगाबाद : फेसबुक तसेच ‘व्हॉटस् अ‍ॅप’ ग्रुप तयार करून त्यावर माहिती, मनोरंजन तर अनेक वेळा बीभत्स चित्र, मजकूर व व्हिडिओ पाठविण्याचे तरुणाईमध्ये मोठे फॅड आलेले आहे; पण जो अशा ग्रुपचा म्होरक्या आहे, त्याला भविष्यात उद्भवणाऱ्या परिणामांची पुसटशीही कल्पना नाही. कायद्याचे तसूभरही ज्ञान नाही. अशा एका ग्रुप अ‍ॅडमिनवर आज पोलीस कोठडीची हवा खाण्याची वेळ आली.
शेख कलीम शेख सिराजोद्दीन (२२), असे अटक करण्यात आलेल्या व्हॉटस् अ‍ॅपवरील एका ग्रुप अ‍ॅडमिनचे नाव आहे. शेख कलीम एका महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेतो. शेख सिराजोद्दीन यांच्या नावाचे कलीमकडे सीम कार्ड आहे. त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या मोबाईलवर व्हॉटस् अ‍ॅपचा एक ग्रुप बनवला. ग्रुपमध्ये त्याच्या फेसबुक अकाऊंटमधील मित्रांना परस्पर सदस्य बनवले. परवा रविवारी रात्री दिनेश अशोक बियाणी (रा. चुनाभट्टी, गांधीनगर) हा घराबाहेर अमन राऊत या आपल्या मित्रासोबत गप्पा मारत उभा होता. त्यावेळी अमनच्या ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून मेसेज आला. त्यात एका देवाचे विडंबनात्मक चित्र होते. दुसऱ्या दिवशी सोमवारी ते आपल्या काही मित्रांसोबत क्रांतीचौक ठाण्यात गेले व अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदरील ग्रुप अ‍ॅडमिनचा शोध घेतला असता तो जोगेश्वरी येथे राहत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन शेख कलीम यास अटक केली. त्याच्याकडे विचारपूस केली असता व्हॉटस् अ‍ॅपवर ते चित्र राजस्थान येथील रोमिओ आसेफ या तरुणाने ग्रुपमध्ये टाकल्याचे त्याने सांगितले. रोमिओ हा शेख कलीमचा फेसबुक मित्र आहे. कलीम त्याला प्रत्यक्ष कधी भेटलाही नाही व त्याच्याशी कधी बोललादेखील नाही, हे विशेष!

Web Title: Group admin arrested on the Whatsapp app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.