भुईमूग माहिती नाही त्यांनी शेतीवर बोलू नये! - खडसे
By Admin | Updated: November 26, 2014 01:51 IST2014-11-26T01:51:29+5:302014-11-26T01:51:29+5:30
मी शेतक:यांचा मुलगा आहे. ज्यांना शेतातील काही कळत नाही, भुईमुगाला शेंगा कुठे लागतात हे ज्यांना माहिती नाही; त्यांनी मला शेतीचे ज्ञान शिकवू नये,
भुईमूग माहिती नाही त्यांनी शेतीवर बोलू नये! - खडसे
अतुल कुलकर्णी- मुंबई
मी शेतक:यांचा मुलगा आहे. ज्यांना शेतातील काही कळत नाही, भुईमुगाला शेंगा कुठे लागतात हे ज्यांना माहिती नाही; त्यांनी मला शेतीचे ज्ञान शिकवू नये, असा टोला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला.
शेतक:यांकडं मोबाइलचं बिल भरायला पैसे आहेत. पण वीज बिलासाठी पैसे नसतात, असं वक्तव्य खडसे यांनी सोमवारी अकोल्यात केलं होतं. त्यावरून उद्धव यांनी खडसेंवर बोचरी टीका केली होती. ठाकरेंच्या टिकेला खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. खडसे म्हणाले, मी मंत्री असलो तरी आमचे कुटुंब आजही शेतातच रहाते. प}ी शेतात काम करते. मी ट्रॅक्टर चालवलेला आहे. ज्यांनी हे कधी केलं नाही, त्यांनी यावर बोलू नये.
माध्यमांमधील काही तरुण पत्रकार आपल्याला शेती कशी करायची हे शिकवू लागले आहेत. मी विद्यार्थी आहे, मला वयाचे बंधन नाही, मला शिकायला आवडते. आता त्यांच्याकडून शेती कशी करायची हे देखील शिकेन, असा चिमटाही खडसे यांनी पत्रकारांना काढला. ते म्हणाले, उभे आयुष्य शेतात गेल्यानंतर काल आलेल्या पत्रकार पोरांकडून शेती कशी करायची हे शिकायचे का? आपण दूरुन मका आहे की ज्वारी आहे हे सांगू शकतो, त्यांच्यावर कोणते रोग पडले आहेत हे देखील सांगू शकतो. या नवख्या पोरांनी हे सांगून दाखवावे आणि हजार रुपये बक्षीस घेऊन जावे, असे आवाहनही खडसे यांनी यावेळी दिले. माङया जेवणाचा अजेंडादेखील जर माध्यमातील नवशिकी पोरं ठरवणार असतील तर माङया लग्नाच्या बायकोला कामच उरणार नाही असे सांगत खडसे म्हणाले, मी शेतक:यांच्या घरात गेलो, त्यांना लाखाची मदत देऊ केली पण या गोष्टी न पहाता आरोप करणो चुकीचे आहे.
आमचे सरकार स्थिर
सरकारच्या स्थिरतीवरही अनेकजण प्रश्न उपस्थित करतात. त्यावर खडसे म्हणाले, आमचे सरकार स्थिर आहे. पूर्ण पाच वर्ष सरकार काम करेल. माङया संपर्कातअसणा:या शिवसेनेच्या अनेक आमदारांनी राजीनामे देऊन भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची तयार दाखवली आहे, असा गौप्यस्फोटही खडसे यांनी केला आहे.