अंतरवेलीवर कोसळला दु:खाचा डोंगर

By Admin | Updated: May 12, 2014 04:33 IST2014-05-11T23:51:30+5:302014-05-12T04:33:17+5:30

अंतरवेलीवर कोसळला दु:खाचा डोंगर

A grieved mountain collapsed on intervale | अंतरवेलीवर कोसळला दु:खाचा डोंगर

अंतरवेलीवर कोसळला दु:खाचा डोंगर

नक्षली हल्ला; शेतकरी कुटुंबातील जवान लक्ष्मण मुंढे शहीद
गंगाखेड : गडचिरोली येथे नक्षलवादी हल्ल्यात पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण मुंढे शहीद झाल्याने गंगाखेड तालुक्यातील अंतरवेली गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
गंगाखेड तालुक्यातील अंतरवेली या छोट्याशा गावात अल्पशा शेतीवर उदरनिर्वाह करणारे मुंढे कुटुंबिय. कुंडलिकराव मुंढे यांचा लक्ष्मण हा मुलगा. लक्ष्मण मुंढे हे मागील पंधरा वर्षांपासून गडचिरोली येथेच स्कोड सी ६० या अति महत्त्वाच्या विभागात कर्तव्य बजावत होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही देशभक्ती आणि कर्तव्याप्रती प्रामाणिक असलेले लक्ष्मण मुंढे यांनी गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागात सेवा बजावण्याचे काम चोखपणे केले. लक्ष्मण मुंढे यांची आई कलावंतीबाई आणि वडिल कुंडलिक हे दोघेही शेती करतात. लक्ष्मण यांना एक भाऊ असून तोही शेती करतो.
लक्ष्मण मुंढे यांच्या प›ात आई, वडिल, एक भाऊ, पत्नी प्रमिला आणि अभिजीत हा मुलगा व आवंतिका ही मुलगी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: A grieved mountain collapsed on intervale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.