साहित्य संमेलनावर दु:खाची छाया
By Admin | Updated: April 5, 2015 01:39 IST2015-04-05T01:39:11+5:302015-04-05T01:39:11+5:30
साहित्य संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी राज्यभरातून साहित्य रसिक पंजाबमधील घुमानला दाखल झाले आहेत.

साहित्य संमेलनावर दु:खाची छाया
श्रीसंतश्रेष्ठ नामदेव महाराज साहित्यानगरी (घुमान) : साहित्य संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी राज्यभरातून साहित्य रसिक पंजाबमधील घुमानला दाखल झाले आहेत. मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने एका रसिकांचा मृत्यू झाल्यामुळे संमेलनावर काहीप्रमाणात दु:खाची छाया पसरली आहे.
कृष्ण अंबटकर (६४) अशी त्यांची नावे आहेत. संमेलनासाठी ते नागपूरहून आले होते. पुण्याहून संमेलनासाठी जाणाऱ्या विशेष रेल्वेमधून आलेल्या अंबटकर यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने पंजाबच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि काही वेळेतच त्यांचा मृत्यू झाला. मात्र वरिष्ठ डॉक्टरांनी हलगर्जीपणाबद्दल रुग्णालय कर्मचारी आणि डॉक्टरांना फैलावर घेतले. याचा राग आल्याने डॉक्टरांनी काम बंद केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी तीन डॉक्टरांना निलंबित केल्याचे समजते.
दरम्यान शुक्र वारी सुधा एका साहित्य रसिकाचे निधन झाले आहे. (प्रतिनिधी)
८२ वर्षांचे गृहस्थ हरवले
पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात रहाणारे ८२ वर्षांचे तुकाराम रावसाहेब पवार हे बियास रेल्वेस्थानकावरून बेपत्ता झाले आहेत. पुण्याहून निघालेल्या विशेष रेल्वेने चार-पाच लोकांच्या ग्रुपबरोबर ते आले होते. त्यातील काही जण अमृतसरला तर काही घुमानला गेले. पवार हे बियासपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचे पुत्र नितीन पवार त्यांना शोधण्यासाठी घुमानला आले आहेत. अमृतसर आणि बियास येथे पोलिसांमध्ये त्यांनी तक्रार दाखल केली आहे.