एकलव्य परिवर्तनमध्ये संत तेरेसांना अभिवादन

By Admin | Updated: September 5, 2016 03:12 IST2016-09-05T03:12:41+5:302016-09-05T03:12:41+5:30

भारतरत्न मदर तेरेसांना व्हॅटिकन सिटीमध्ये संत उपाधी प्रदान केली जाणार असल्याच्या पूर्वसंध्येला उसगावमध्ये मदर तेरेसांच्या प्रतिमेसह रॅली आणि विशेष सभेचे आयोजन करून अनोखे अभिवादन केले

Greetings to Saint Terez in Ekalavya Transformation | एकलव्य परिवर्तनमध्ये संत तेरेसांना अभिवादन

एकलव्य परिवर्तनमध्ये संत तेरेसांना अभिवादन


वसई : विधायक संसद संचालित एकलव्य परिवर्तन विद्यालयाच्या आदिवासी विद्यार्थिनींनी विधायक संसदच्या साने गुरुजी संकुल प्रांगणात भारतरत्न मदर तेरेसांना व्हॅटिकन सिटीमध्ये संत उपाधी प्रदान केली जाणार असल्याच्या पूर्वसंध्येला उसगावमध्ये मदर तेरेसांच्या प्रतिमेसह रॅली आणि विशेष सभेचे आयोजन करून अनोखे अभिवादन केले. या वेळी त्यांच्या मदर तेरेसा झिंदाबाद... झिंदाबाद... झिंदाबाद..., मदर तेरेसा अमर रहे... अमर रहे, भारत माता की जय! वंदे मातरम् या घोषणांनी उसगावचा परिसर काही काळासाठी जोरदार निनादून गेला होता.
एकलव्य परिवर्तनाच्या शिक्षक आणि विद्यार्थिनींनी आयोजित केलेल्या अभिवादन सभेत शाळेचे मुख्याध्यापक उमेश पष्टे, शिक्षिका पूनम पागी यांच्यासह प्रियंका टोकरे,वृंदा, कांचना चावरे, संचिता मुकणे, विठा लोखंडे या विद्यार्थिनींनी मदर तेरेसांच्या जीवनकार्याची उपस्थितांना मनोगतांद्वारे माहिती दिली. तर अंकिता चौधरी, मनीषा मुकणे, आरती वाघ, बेबी, बेबी चौधरी, जुही गावित, ज्योत्स्रा कामडी यांनी मदरच्या सुप्रसिद्ध सुवचनांचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपाली हिलीम हिने, तर सूत्रसंचालन मनीषा जनाठे हिने केले. (प्रतिनिधी)
मदर तेरेसांच्या संतपदावर पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकनमध्ये ४ सप्टेंबर रोजी एका भव्य कार्यक्रमात शिक्कामोर्तब केले. त्यानिमित्ताने लुडसमाता चर्च, शिरलंय, आगाशी येथे विशेष कार्यक्रम झाला. गावपरिवारातून मदरच्या विचारांचे फलक घेऊन श्रद्धावंत चर्चमध्ये जमले व फादर्स व सिस्टर्स यांच्या मार्गदर्शनाखाली पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर चर्चमध्ये प्रार्थना झाली. या वेळी संदेश देताना फादर दिब्रिटो म्हणाले, मदर तेरेसा या जगाच्या नागरिक होत्या. त्यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी आपले उभे आयुष्य वेचले आणि आपल्या कार्याद्वारे गरिबांना प्रतिष्ठा मिळवून दिली.

Web Title: Greetings to Saint Terez in Ekalavya Transformation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.