महायुती विस्तारली! जनसुराज्य पक्ष भाजपाचा नवा मित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 13:53 IST2016-10-26T13:53:16+5:302016-10-26T13:53:16+5:30
माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष महायुतीत सामील झाला आहे. त्यामुळे महायुतीत सहभागी पक्षांची संख्या आता सहा झाली आहे.
महायुती विस्तारली! जनसुराज्य पक्ष भाजपाचा नवा मित्र
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, 26 - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी भाजपाला नवा मित्र मिळाला आहे. माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष महायुतीत सामील झाला आहे. त्यामुळे महायुतीत सहभागी पक्षांची संख्या आता सहा झाली आहे.
जनसुराज्य पक्षाला महायुतीत आणण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले होते. दरम्यान जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विनय कोरे यांनी आघाडी सकरारच्या काळात काहीकाळ अपारंपरिक ऊर्जामंत्रीपद भूषवले होते.
जनसुराज्य पक्षाचा पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात प्रभाव असून, आगामी निवडणुकांमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात हा पक्ष भाजपाशी आघाडी करणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात ताकद विस्तारण्यास भाजपाला मदत होईल.