शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

महिला पोलिसांना मोठा दिलासा, आता ८ तासच ड्युटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 07:44 IST

नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलीस महासंचालक पांडे यांनी पोलीस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती.

मुंबई : महाराष्ट्र सरकारने महिलापोलिसांच्या कामाचे तास १२ तासांवरून ८ तासांवर आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे महिलापोलिसांना दिलासा मिळाला असून, त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलीस महासंचालक पांडे यांनी पोलीस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्यूटी जाहीर केली होती. त्यापाठोपाठ नागपूर, अमरावती आणि नुकतेच नवी मुंबई पोलिसांनीही असा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. अखेर राज्य पातळीवर निर्णय घेण्यात आला असून, संपूर्ण राज्य पोलीस दलातील महिला पोलिसांना ८ तासांची ड्युटी मिळणार आहे.पोलीस दलात कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांवर कामाबरोबरच कौटुंबिक जबाबदारीचा भारही आहे. अशात सण-उत्सव बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेकदा ८ तासांपेक्षा जास्त वेळ कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांची कौटुंबिक जबाबदारी आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मानसिक ताण वाढत आहे. काही महिला पोलिसांनीही ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली होती. 

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिलाMaharashtraमहाराष्ट्र