शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मोठा दिलासा! एप्रिलमध्ये प्रथमच बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 06:19 IST

CoronaVirus in Maharashtra: राज्यात शुक्रवारी दिवसभरात ६६ हजार ८३६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या मात्र ७४ हजार ४५ इतकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात दुसऱ्या लाटेने एकीकडे नव्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, बरे होणाऱ्यांची संख्या मात्र कमीच असल्याचे चित्र होते. शुक्रवारची आकडेवारी मात्र थोडी दिलासादायक आहे. एप्रिल महिन्यात प्रथमच नव्या बाधित होणाऱ्यांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आली आहे.राज्यात शुक्रवारी दिवसभरात ६६ हजार ८३६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या मात्र ७४ हजार ४५ इतकी आहे. बाधित होणाऱ्यांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सुमारे सात हजारांपेक्षा जास्त आहे. या महिन्यात प्रथमच बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असून, हा कल पुढील काही दिवस कायम राहिल्यास, राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण नक्कीच कमी होईल. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७२२१ नवीन रुग्ण सापडले आहेत. 

दिवसभरात ७७३ मृत्यू n शुक्रवारी बाधित झालेल्या ६६ हजार ८३६ रुग्णांमुळे बाधितांची संख्या ४१ लाख ६१ हजार ६७६ झाली आहे, तर दिवसभरात ७४ हजार ४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ३४ लाख ४ हजार ७९२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. n यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.८१ एवढे झाले आहे. कोरोना मृत्युदर मात्र १.५२ टक्के इतका असून, दिवसभरात ७७३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. n आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ५१ लाख ७३ हजार ५९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४१ लाख ६१ हजार ६७६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१ लाख ८८ हजार २६६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर २९ हजार ३७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या