केकेआरचे ईडनवर भव्य स्वागत
By Admin | Updated: June 3, 2014 23:34 IST2014-06-03T23:34:35+5:302014-06-03T23:34:35+5:30
या समारंभाला जवळजवळ एक लाख चाहते व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

केकेआरचे ईडनवर भव्य स्वागत
>एक लाख चाहते उपस्थित : कोरबो, लोरबो, जीतबो रे..
कोलकाता : शाहरुख खान दोन तास उशिरा पोहोचला असला तरी आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मंगळवारी ईडन गार्डन्सवर आयोजित स्वागत समारंभाची चमक जराही फिकी पडली नाही. या समारंभाला जवळजवळ एक लाख चाहते व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
केकेआर संघाचा सहमालक असलेल्या शाहरुखने प्रेक्षकांच्या गर्दीने फुललेल्या ईडन गार्डन्सवर चाहत्यांचे आभार व्यक्त केले. शाहरुखने संघातील सर्व खेळाडूंसह स्टेडियममध्ये फेरी मारली. या वेळी संघाचे स्लोगन ‘कोरबो, लोरबो, जीतबो रे.. अमी कोलकाता, व्ही रुल.. हम राज करते है.. हे सूर निनादत होते. कर्णधार गौतम गंभीर चषक उंचावत सहमालक जुही चावलासह ‘व्हिक्टरी लॅप’मध्ये सहभागी झाला. शाहरुखने टि¦टरवर उशिरा येण्याबाबत चाहत्यांची क्षमा मागितली.
शाहरुखने टि¦ट केले की, ‘मला क्षमा करा. विमानामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे मला पोहोचण्यास उशीर होणार आहे, पण उपस्थित राहणार, हे निश्चित.’त्याआधी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्टेडियममध्ये दाखल झाल्यानंतर केकेआर संघाचे खेळाडू ‘एसयूव्ही’वर स्टेडिममध्ये ‘व्हिक्टरी लॅप’मध्ये सहभागी झाले. (वृत्तसंस्था)
4जवळजवळ 6क् हजार चाहत्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश मिळविला होता, पण हजारो चाहते मैदानात प्रवेश मिळविण्यासाठी गोंधळ घालीत असल्याचे चित्र होते. पोलीस ठाणो व कॅबची मान्यता असलेल्या क्लबकडून मोफत पास प्राप्त करणा:या चाहत्यांना स्टेडियममध्ये नि:शुल्क प्रवेश होता.
4शाहरुख 4 च्या सुमारास स्टेडियममध्ये दाखल झाला. सहमालक शाहरुख, जुही आणि जय मेहता यांनी कर्णधार गौतम गंभीर व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केक कापला त्यावेळी उपस्थित चाहत्यांनी जल्लोष केला. बंगाल क्रिकेट संघटनेचे प्रमुख जगमोहन दालमिया यांनी केकेआर संघातील प्रत्येक सदस्य व सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 1क् ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी प्रदान करीत कार्यक्रमाला सुरुवात केली.