शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राजमाता अहिल्यादेवींनी पंढरीत स्थापिले श्रीरामाचे भव्य मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 14:23 IST

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात अनेक ठिकाणी महादेवाच्या मंदिरांची स्थापना केली.

ठळक मुद्देश्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची संगमरवरी दगडातील आकर्षक व सुबक मूर्ती आजही येथे पाहावयास मिळतेअहिल्यादेवींच्या विविध कार्यापैकी पंढरपुरातील हे एक आगळेवेगळे कार्य असल्याचे दिसून येते.आजही या वाड्याच्या बांधकामाची मांडणी लक्ष वेधून घेते़, शिवाय या वाड्यात राजमाता अहिल्यादेवी यांचा अर्धाकृती पुतळाही आहे

प्रभू पुजारी 

पंढरपूर : ‘चंद्रभागा तीरी उभी पंढरी’ असे म्हटले जाते़ त्याच चंद्रभागेच्या काठावर अहिल्यादेवी होळकर यांनीही एक चिरेबंदी वाडा बांधला आहे़ विविध ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी शिवलिंगांची स्थापना केली; मात्र केवळ पंढरीत या एकाच ठिकाणी या वाड्यात श्रीराम आणि हनुमानाच्या मंदिराची स्थापना केली. अहिल्यादेवींच्या विविध कार्यापैकी पंढरपुरातील हे एक आगळेवेगळे कार्य असल्याचे दिसून येते.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात अनेक ठिकाणी महादेवाच्या मंदिरांची स्थापना केली. त्या-त्या ठिकाणी धर्मशाळा काढल्या; मात्र पंढरपुरात त्यांचे एक वेगळेच कार्य दिसून येते़ १७६८ साली अहिल्यादेवी होळकर यांनी श्रीरामाचे मंदिर बांधले. राजमाता अहिल्यादेवींनी सर्वत्र महादेवाच्या मंदिरांची स्थापना केली, पण पंढरपुरातच श्रीरामाचे मंदिर का बांधले? असा प्रश्न पडतो़ याबाबत अधिक माहिती घेतली असता, जेव्हा या वाड्याच्या बांधकामासाठी पाया खोदला जात होता. तेव्हा पाया खोदताना मारुतीची स्वयंभू मूर्ती सापडली, त्यामुळेच येथे श्रीराम आणि मारुती मंदिराची स्थापना केली. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची संगमरवरी दगडातील आकर्षक व सुबक मूर्ती आजही येथे पाहावयास मिळते.

 या मंदिरात शिवलिंग आणि नंदीही आहे़ समोरच हनुमानाचे मंदिर आहे. शिवाय राजमाता अहिल्यादेवींचे नातू काशीराव दादा होळकर यांनी श्रीराम मंदिरातच राजमाता अहिल्यादेवी यांची संगमरवर दगडातील आकर्षक मूर्ती बनवून त्याची प्रतिष्ठापना केली आहे. सध्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चॅरिटीज ट्रस्ट इंदोर अंतर्गत सेवक म्हणून गिरीष बोरखेडकर हे काम पाहत आहेत.

गेली १५० वर्षे झाली, परंतु चंद्रभागा काठावरील हा होळकरवाडा तसाच मजबूत आहे़ चंद्रभागा काठी असल्याने अनेकवेळा महापूर येऊन गेला पण त्याचा काहीच परिणाम या वाड्यावर झालेला दिसून येत नाही़ यावरून हा वाडा किती मजबूत आहे हे दिसून येते.

असा आहे होळकर वाडा- चंद्रभागा नदीच्या काठावर, महाद्वार घाटावर आणि विठ्ठल मंदिराच्या पूर्व दिशेला चिरेबंदी असा होळकरवाडा आहे़ सुमारे दोन एकर परिसरात दगडामध्ये हा वाडा बांधला आहे. या वाड्याच्या पश्चिमेस आणि दक्षिणेस प्रवेशद्वार आहे. या वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेस तर श्रीराम मंदिराकडे जाण्यासाठी दक्षिणेस महाद्वार घाटाशेजारी प्रवेशद्वार आहे़ पश्चिम प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर चिरेबंदी भव्य वाडा दिसतो़ ओसरीतून आत गेल्यानंतर मोकळे अंगण दिसते़ पुढे एक चौकशी कट्टा आहे़ अंगणाच्या चारही बाजूंनी बांधकाम आहे़ चौकोनी दगडावर सागवानी खांब उभे करून त्या खांबावर आकर्षकपणे मांडणी करून छत उभारण्यात आले आहे़ आजही या वाड्याच्या बांधकामाची मांडणी लक्ष वेधून घेते़ शिवाय या वाड्यात राजमाता अहिल्यादेवी यांचा अर्धाकृती पुतळाही आहे़

आगळेवेगळे शिवलिंग- होळकर वाड्यातील श्रीराम मंदिरात एक आगळेवेगळे शिवलिंग पाहावयास मिळते़ एक शिवलिंग (पिंड) असून त्यावर ११ शिवलिंग कोरलेले आहे़ शिवाय शेजारी नंदी आहे. या आगळ्यावेगळ्या शिवलिंगाची आणि नंदीची प्रतिष्ठापनाही अहिल्यादेवी होळकर यांनी केल्याचे सांगण्यात आले़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर