ग्रामीण बँकेची 20 लाखांची रोकड लुटली

By Admin | Updated: September 2, 2014 02:12 IST2014-09-02T02:12:31+5:302014-09-02T02:12:31+5:30

मोटार अडवून सशस्त्र दुचाकीस्वार चोरटय़ांनी बँकेच्या रोखपालासह सुरक्षारक्षकास बेदम मारहाण करीत 2क् लाखांची रोकड पळविली.

Grameen Bank looted 20 lakhs of cash | ग्रामीण बँकेची 20 लाखांची रोकड लुटली

ग्रामीण बँकेची 20 लाखांची रोकड लुटली

तीर्थपुरी (जि. जालना) : अंबड ते घनसावंगी रस्त्यावरील हिवरा शिवारात सोमवारी दुपारी मोटार अडवून सशस्त्र दुचाकीस्वार चोरटय़ांनी बँकेच्या रोखपालासह सुरक्षारक्षकास बेदम मारहाण करीत 2क् लाखांची रोकड पळविली.
तीर्थपुरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील रोखपाल पी.जी. गोराडकर व सुरक्षारक्षक अंकुश लव्हटे 2क् लाख घेऊन इंडिका कारने जालन्याच्या चिखली अर्बन बँकेतून निघाले हाते. तीर्थपुरीच्या अलीकडे 4 किमीवर खा. हिवरा शिवारात पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी ही गाडी अडविली आणि कारचालक सचिन लव्हटे याच्या मानेवर गुप्ती ठेवली. तर गोराडकर बसलेल्या काचेवर सळईने जोरदार प्रहार केला. त्यानंतर सुरक्षारक्षक लव्हाटेच्या उजव्या पायावर चोरटय़ांनी जोरदार प्रहार केला. सुरक्षारक्षक व रोखपालाने त्या स्थितीत आरडाओरड सुरू केली तेव्हा रोकड असलेली बॅग घेऊन दोघे चोरटे दुचाकीवरून पळाले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Grameen Bank looted 20 lakhs of cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.