वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी ५० वर ग्रामपंचायतींचे ठराव
By Admin | Updated: February 1, 2015 00:54 IST2015-02-01T00:54:10+5:302015-02-01T00:54:10+5:30
यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी दिग्रस तालुक्यातील पन्नासावर ग्रामपंचायतींनी

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी ५० वर ग्रामपंचायतींचे ठराव
जागरण जनमंचचा पुढाकार : केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन
दिग्रस (यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी दिग्रस तालुक्यातील पन्नासावर ग्रामपंचायतींनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत ठराव घेतला. जागरण जनमंचच्या पुढाकारात विविध संघटनांच्यावतीने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी लोकमत मीडिया प्रा.लि. चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी सुरूवातीपासून पुढाकार घेतला आहे. त्यांच्याच प्रयत्नांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली. यवतमाळ येथे तत्कालिन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर या रेल्वे मार्गाला रेल्वेच्या अर्थसंकल्पात अत्यल्प निधी मिळाला.
खा. विजय दर्डा निधीसाठी नेहमी आग्रही असतात. त्यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी आता दिग्रस तालुक्यातील जनताही त्यांच्या सोबतीला आली आहे. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींनी ठराव करून आगामी रेल्वे अर्थसंकल्पात मोठी तरतूद या प्रकल्पासाठी करावी, अशी मागणी केली आहे.
यासाठी जागरण जनमंचने पुढाकार घेतला असून, सर्वपक्षीय नेत्यांसह तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने एक निवेदन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांना तहसीलदार नितीन देवरे यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले.
या निवेदनावर सुधीर देशमुख, सुभाष अटल, सुरेंद्र मिश्रा, नवीन गड्डा, प्रा. विठ्ठल काटेवाले, महादेव सुपारे, दीपक वानखेडे, राज चव्हाण, रवींद्र अरगडे, अरविंद मिश्रा, संजीव चोपडे, मंगेश दुद्दलवार, नीरज दुद्दलवार, रामदास पद्मावार, अतीश शिंदे, रमाकांत काळे, रामभाऊ मारशेटवार, केतन रत्नपारखी, पवन गावंडे, अभय इंगळे, मजहर खान, कमलेश आडे, लालसिंग राठोड, उद्धव अंभुरे, प्रफुल्ल व्यवहारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
या ग्रामपंचायतींनी केला ठराव
प्रजासत्ताक दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत तालुक्यातील साखरा, सावंगा खुर्द, तिवरी, खंडापूर, चिंचोली क्र. १, निंभा, सेवानगर, इसापूर, रामनगर, राहटी, झिरपूरवाडी, शिवणी, फेट्री, रुई तलाव, महागाव, साखरी, काटी, मरसूळ, रुई मोठी, लाख रायाजी, हरसूल, बेलोरा, आरंभी, वसंतनगर, कांदळी, डेहणी, धानोरा खु., माळहिवरा, डोळंबा, आमला बु., चिरकुटा, विठोली, वाई मेंढी, लिंगीवाई, वाई, खेकडी, मोख, चिचपातर, मांडवा, कळसा, धानोरा बु., सावंगा बु., देऊरवाडा, विठाळा, तुपटाकळी येथील ग्रामपंचायतींनी रेल्वेमार्ग तत्काळ पूर्ण करण्यासाठी ठराव घेतला आहे.