ग्रामपंचायतीचे संगणक पोहचले चहाच्या टपरीत!
By Admin | Updated: August 11, 2016 16:12 IST2016-08-11T16:12:24+5:302016-08-11T16:12:24+5:30
पंचायतराज संस्थांचे संगणकीय बळकटीकरण करण्यासाठी राज्यशासनाने ३३ जिल्हा परिषदांना १३२ संगणक, ३३ प्रिंटर, पंचायत समित्यांना ३५१ संगणक व प्रिंटर आणि २७ हजार ८९१

ग्रामपंचायतीचे संगणक पोहचले चहाच्या टपरीत!
>- सुनील काकडे,
वाशिम, दि. 11 - पंचायतराज संस्थांचे संगणकीय बळकटीकरण करण्यासाठी राज्यशासनाने ३३ जिल्हा परिषदांना १३२ संगणक, ३३ प्रिंटर, पंचायत समित्यांना ३५१ संगणक व प्रिंटर आणि २७ हजार ८९१ ग्रामपंचायतींना तेवढेच संगणक व प्रिंटर उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, तज्ज्ञ तथा प्रशिक्षित कर्मचाºयांअभावी बहुतांश ठिकाणचे संगणक व प्रिंटर धूळखात पडले असून वाशिम तालुक्यातील फाळेगांव थेट ग्रामपंचायतीचे नवेकोरे संगणक गुरूवार, ११ आॅगस्ट रोजी चक्क वाशिमच्या एका चहाच्या टपरीत आढळून आले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालणारी विविध कामे, दिल्या जाणारे दाखले, १३ वा, १४ व्या वित्त आयोगाची कामे, यासह इतर विकासकामांची अद्ययावत नोंद ठेवण्यासाठी नोव्हेंबर २०११ पासून संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) नावाच्या महाआॅनलाईन कंपनीकडून काम चालत असे. मात्र, संगणक परिचालकांच्या मानधनामध्ये झालेल्या गैरप्रकारासह विविध तांत्रिक अडचणींमुळे ‘संग्राम’चे कार्य २०१५ च्या शेवटच्या महिण्यांत गुंडाळल्या गेले. परिणामी, ‘आॅनलाईन’ झालेल्या राज्यातील अनेक ग्रामपंचायती सद्या मात्र ‘आॅफलाईन’ झाल्या आहेत. अशा स्थितीत खासगी संगणक परिचालकांकडून ग्रामपंचायतींना कामे करून घ्यावी लागत असून ग्रामपंचायतीच्या कार्यालयांमधील संगणक चक्क बाहेर पडत आहेत. वाशिम तालुक्यातील फाळेगांव थेट या ग्रामपंचायतीचे नवेकोरे संगणक गुरूवारी वाशिमच्या एका चहाच्या टपरीत आढळून आले. यासंदर्भात अधिक चौकशी केली असता, संगणकामध्ये बँकेच्या कामकाजासंदर्भातील ‘सॉप्टवेअर अपलोड’ करून देणाºया एका मुलाने हे संगणक याठिकाणी ठेवल्याची बाब उघड झाली.