शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जानेवारी अखेर; आयोगाची तयारी, प्रारूप मतदार यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 14:45 IST

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात नांदेड, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, लातूर, जालना जिल्ह्याचा समावेश असून त्या मतदारसंघात ५४ हजार ४१३ मतदार नोंदले आहेत.

मुंबई : पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या एकूण पाच जागांसाठी जानेवारी अखेर निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची जोरदार तयारी सुरू असून प्रारूप याद्या ही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.दर सहा वर्षांनी होणाऱ्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघातून निवडून गेलेले काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे आणि अमरावती मधून भाजपचे डॉ. रणजित पाटील त्याचप्रमाणे नागपूर शिक्षक मतदारसंघातून भाजप पुरस्कृत ना. गो. गाणार, औरंगाबाद मधून राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि कोकण शिक्षक मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांच्यासुद्धा विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत ७ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. या पाचही सदस्यांना मागील अधिवेशनात निरोप देण्यात आला आहे. आता या पाचही मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर होणार असल्यामुळे मतदार नोंदणी अखेरच्या टप्प्यात आली आहे. 

कुठे किती मतदार नोंदणी - नाशिक पदवीधर मतदारसंघात नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. या मतदारसंघात बुधवार अखेर १ लाख ५५ हजार ३२० मतदारांची नोंदणी झाली आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघात बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. तेथे १ लाख २५ हजार ९२४ मतदारांची नोंदणी झाली आहे.- औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात नांदेड, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, लातूर, जालना जिल्ह्याचा समावेश असून त्या मतदारसंघात ५४ हजार ४१३ मतदार नोंदले आहेत. मागील वेळी येथे ५८ हजार ४१० मतदार नोंदवले गेले होते. नागपूर शिक्षक मतदारसंघात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. तेथे ३३ हजार ५०२ मतदारांची नोंदणी झाली आहे. मागील वेळेस ३५ हजार ९ मतांची संख्या होती. - कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. त्या मतदारसंघात ३० हजार १६२ मतदार नोंदणी झाली. गेल्या वेळी ३७ हजार ६०४ मतदार नोंदले होते. मतदार नोंदणीसाठी महिना शिल्लक असल्याने मतदार संख्येत भर पडेल. 

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र