शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मंत्र्यांच्या गाडीला झटक्यात जीआर, आमच्या पगाराला नियमच फार; शिक्षक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 17:56 IST

विनाअनुदानित शिक्षक, बेरोजगार बीएडधारकांची चरफड

अविनाश साबापुरे यवतमाळ : कोरोना काळात राज्य आर्थिक संकटात असल्याची आवई उठविली जात असताना दुसरीकडे शिक्षणमंत्र्यांसाठी नवीन कार खरेदी करण्याचा जीआर एका झटक्यात निर्गमित करण्यात आला. तर दुसरीकडे विनाअनुदानित शिक्षकांसाठी तरतूद करूनही पगाराचा जीआर निर्गमित करण्यासाठी नियम दाखविले जात आहेत. यामुळे राज्यातील बिनपगारी शिक्षकांमध्ये संताप उसळला आहे. तर बीएडधारक बेरोजगारांनी सोशल मीडियातून याविरुद्ध आवाज उठविला आहे.

शालेय शिक्षण विभागाने ३ जुलै रोजी शिक्षण मंत्र्यांसाठी नवीन गाडी खरेदी करणे आणि त्यासाठी धनादेश संबंधित कंपनीला हस्तांतरित करण्याबाबतचा जीआर काढला आहे. हाच जीआर टिष्ट्वटरवर पोस्ट करून डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनने आपला संताप नोंदविला आहे. ‘शिक्षणमंत्र्यांना २२ लाखांची गाडी घेण्यासाठी अर्थ मंत्रालयाची लगेच परवानगी मिळते. पण रखडलेल्या शिक्षक भरतीची फाईल दोन महिन्यांपासून अर्थ मंत्रालयात परवानगीसाठी धूळखात पडून राहते’ असे टिष्ट्वट असोसिएशनचे राज्य अध्यक्ष संतोष मगर यांनी केले आहे. विशेष म्हणजे हे टिष्ट्वट मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण राज्यमंत्री यांना टॅग करण्यात आले आहे. टिष्ट्वट पोस्ट होताच राज्यातील संतप्त शिक्षकांनी, बेरोजगार उमेदवारांनी त्यावर भराभर निषेधाच्या प्रतिक्रियांचा भडिमार सुरू केला आहे. 

तर दुसरीकडे, गेल्या २० वर्षांपासून विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये बिनपगारी काम करणाºया शिक्षकांसाठी गेल्या अधिवेशनात वेतन अनुदानाची तरतूद करण्यात आली. मात्र अद्यापही त्यासाठी जीआर निर्गमित न झाल्याने या शिक्षकांच्या हाती पगार पडलेला नाही. उलट शिक्षण संचालक, उपसंचालक स्तरावरून त्यासाठी वारंवार शाळांची माहिती मागविली जात आहे. त्यामुळे शिक्षण मंत्र्यासाठी गाडी खरेदीचा जीआर दिसताच या शिक्षकांनी संताप नोंदविला आहे. 

कोरोना काळात लॉकडाऊन लागू झाल्याने सरकारचे उत्पन्न घटल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे विविध योजनांना कात्री लावून कर्मचाºयांचे पगारही कपात करण्याची भाषा सुरू आहे. मंत्र्यांच्या कामकाजासाठी वाहन आवश्यक असले तरी राज्य आर्थिक संकटात असताना हा खर्च टाळावा, अशी मागणी होत आहे.

बेरोजगार युवक शुक्रवारी जाळणार पदव्याशिक्षकांचे, बेरोजगार शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवून शिक्षण मंत्री लाखो रुपयांची गाडी खरेदी करीत आहे, या विरोधात शुक्रवारी १० जुलै रोजी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. लॉकडाऊनच्या निकषांमुळे हे आंदोलन प्रत्येक बेरोजगार आपापल्या घरी आपल्या पदव्या जाळून त्याचे फोटो व्हायरल करणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे राज्याध्यक्ष संतोष मगर यांनी दिली. शिवाय याबाबत रविवारीच मुख्यमंत्र्यांना इमेलही पाठविण्यात आला.

पगार सहा हजार, घरभाडे आठ हजार!शिक्षण सेवकांचे मानधन वाढविण्याची मागणी शिक्षण विभागाने प्रलंबित ठेवली आहे. शिक्षण सेवक म्हणून रुजू झालेल्या उमेदवारांना इतर शहरांमध्ये राहावे लागत आहे. पुणे महापालिकेच्या शाळेत शिक्षण सेवक असलेल्या वैभव पटांगडे यांना ६ हजार मासिक मानधन असून त्यांचे घरभाडे मात्र ८ हजार आहे. त्यामुळे जगावे कसे, हा प्रश्न पटांगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.

टॅग्स :Teacherशिक्षक