शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

मदतीबाबतचा जीआर पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारा - वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 03:07 IST

मंत्री पूरग्रस्तांच्या मदतीला आले की पर्यटनाला?

कºहाड (सातारा) : कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्यात सरकार अपयशी ठरले असताना दुसरीकडे दोन दिवस पाण्यात बुडालेल्यांनाच सरकारी मदत देण्याचा शासन आदेश काढून सरकारने पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मंत्री पूरग्रस्तांच्या मदतीला आले की पर्यटनाला? असा सवालही त्यांनी केला.वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, या भागातील परिस्थिती अजूनही भीषण आहे. सरकारी यंत्रणा तोकडी पडली असून अनेक भागातील पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहचलेली नाही. मुळात ही मदत घरगुती नुकसान झालेल्यांसाठीच आहे. परंतु पुराच्या तडाख्यात छोटे व्यापारी, दुकानदार, यांचेही मोठे नुकसान झालेले आहे. त्यांच्या उदरनिवार्हाचे साधनच महापुरात उद्ध्वस्त झालेले आहे. त्यांनाही मदतीची आवश्यकता आहे. या शासन आदेशात या दुकानदारांचा व हातावर पोट असलेल्यांचा समावेश नाही. नुकसान सर्वांचेच झाले असताना मदत देताना असा भेदभाव कशासाठी? पूरग्रस्त भागाच्या पाहणीवेळी हसतमुख सेल्फी काढणारे मंत्री गिरीश महाजन यांचाही वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. सरकारचे मंत्री पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी आले आहेत का पूरपर्यटनाला? असा सवाल त्यांनी विचारला आहे. मंत्र्यांना परिस्थितीचे गांभीर्य नसून हा लाजिरवाणा प्रकार आहे, असे ते म्हणाले.अलमट्टी धरणातून कर्नाटक सरकारने पाणी सोडले यावरही त्यांनी शंका उपस्थित केली. पाण्याचा विसर्ग झाला असता तर सांगली भागात पाणी ओसरले असते पण या भागात तर पाण्याची पातळी वाढतच आहे. त्यामुळे पाणी सोडल्याचा दावा खोटा वाटत आहे. याप्रश्नी कर्नाटक सरकार खोटे बोलत आहे, का महाराष्ट्र सरकार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर