गोविंद पानसरे हत्याप्रकरण, समीर गायकवाडचा ब्रेन मॅपिंगसाठी नकार
By Admin | Updated: October 9, 2015 15:53 IST2015-10-09T15:46:18+5:302015-10-09T15:53:45+5:30
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडने ब्रेन मॅपिंग चाचणीस नकार दिला आहे.

गोविंद पानसरे हत्याप्रकरण, समीर गायकवाडचा ब्रेन मॅपिंगसाठी नकार
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि.९ - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडने ब्रेन मॅपिंग चाचणीस नकार दिला आहे. त्यामुळे समीरच्या ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी पोलिसांनी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे.
कॉ. गोविंद पानसरे यांच्य हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी १६ सप्टेंबररोजी सनातन संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाडला अटक केली आहे. १२ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर समीरची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. समीर तपासात सहकार्य करत नसल्याने त्याची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यास परवनागी द्यावी असा अर्ज पोलिसांनी कोल्हापूरमधील न्यायालयासमोर केला होता. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. समीरने ब्रेन मॅपिंगसाठी नकार दिल्याने कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच समीरच्या न्यायालयीन कोठडीत २३ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.