गोविंद पानसरे हत्या: समीर गायकवाडचा जामीन अर्ज
By Admin | Updated: April 28, 2017 02:55 IST2017-04-28T02:55:17+5:302017-04-28T02:55:17+5:30
गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कारागृहात असणारा संशयित आरोपी समीर गायकवाड याने जामीन मिळावा यासाठी गुरुवारी जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी वकिलांमार्फत अर्ज दाखल केला.

गोविंद पानसरे हत्या: समीर गायकवाडचा जामीन अर्ज
कोल्हापूर : गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कारागृहात असणारा संशयित आरोपी समीर गायकवाड याने जामीन मिळावा यासाठी गुरुवारी जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी वकिलांमार्फत अर्ज दाखल केला.
आजच्या सुनावणीवेळी सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्या नियुक्तीच्या आक्षेपाबाबतही म्हणणे मांडण्यास वरिष्ठ तपास अधिकारी उपस्थित नसल्याने न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दि. १५ मे रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. त्या दिवशी जामीन अर्जाबाबत तसेच राणे यांच्या नियुक्तीबाबत दोन्ही बाजूंचे म्हणणे मांडले जाणार आहे. (प्रतिनिधी)