शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis : "केंद्राच्या दबावामुळेच राज्यपाल निर्णय घेत आहेत", नाना पटोलेंचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 16:29 IST

Maharashtra Political Crisis : राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला ) बहुमत चाचणीसाठी आदेश दिले आहेत. यावरून कॉंग्रेसचे नेते नाना पटोले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडी सरकारचा जोरदार सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले आहे. यात राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला ) बहुमत चाचणीसाठी आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आले असून भाजपच्या गोटातही मोठ्या हालचाली सुरु आहेत. यावरून कॉंग्रेसचे नेते नाना पटोले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्यपाल भाजपच्या अजेंड्यावर काम करत आहेत. आम्ही आज सुद्धा बहुमत चाचणीसाठी तयार आहोत. पण ही प्रक्रिया संविधानिक पद्धतीने पार पडली पाहिजे. केंद्राच्या दबावामुळेच राज्यपाल निर्णय घेत आहेत. विधानसभा कुस्तीचा आखाडा नाही. अजून १६ आमदारांबाबत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपालांना एवढी कशाची घाई झाली आहे? केंद्र सरकारच्या दबावामुळे हे सुरु आहे. एवढी तत्परता विधानसभा अध्यक्षपद निवडणूक, १२ आमदारांच्या नियुक्तीत का नाही दाखवली, असा थेट सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे.

माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी राज्यपालांनी सांगितलं होते की, प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे आणि आता राज्यपाल बहुमत सिद्ध करायला सांगत आहेत. आमची काल पण तयारी होती आणि उद्याही बहुमत सिद्ध करण्याची तयारी आहे. पण राज्यपालाची भूमिका दुट्टपी आहे.आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. मला खात्री आहे की आम्हाला न्याय मिळेल, असेही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान,  एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले आहे. विधीमंडळातील बहुमत चाचणीच्या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्याचे राजकारण आता निर्णायक स्थितीत आले आहे. शिवसेनेने राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयात आज (बुधवारी) संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे. शिवसेनेकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी