शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे राज्यपाल होणार मुख्यमंत्री? रमेश बैस छत्तीसगडला परत जाण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 08:16 IST

छत्तीसगडशी त्यांची नाळ आजही किती पक्की आहे आणि त्यांची लोकप्रियता अजूनही कशी कायम आहे, याचा प्रत्यय त्यांच्या वाढदिवशी रायपूरमध्ये झालेल्या सत्काराच्या निमित्ताने आला. त्यांच्या सत्काराला चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. 

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. छत्तीसगडशी त्यांची नाळ आजही किती पक्की आहे आणि त्यांची लोकप्रियता अजूनही कशी कायम आहे, याचा प्रत्यय त्यांच्या वाढदिवशी रायपूरमध्ये झालेल्या सत्काराच्या निमित्ताने आला. त्यांच्या सत्काराला चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. छत्तीसगडमध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला होता. डॉ. रमणसिंग यांच्या नेतृत्वात तीनवेळा सत्तेत आलेल्या भाजपला मोठा धक्का बसला होता. यावेळी पराभवाचा डाग पुसून भाजपला पुन्हा सत्ता आणायची असेल तर रमेश बैस यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा, अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. भाजप श्रेष्ठीही त्या दृष्टीने विचार करत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. 

आश्वासक चेहरा - भाजपला विजयापर्यंत नेऊ शकेल, असा मोठा चेहरा आज छत्तीसगडमध्ये नाही. डॉ. रमण सिंग यांचा पूर्वीचा प्रभाव राहिलेला नाही. त्यामुळेच विविध राज्यांचे गेल्या काही वर्षांपासून राज्यपाल राहत आलेले रमेश बैस यांना परत आणण्याचा विचार सुरू झाला आहे. - ओबीसी नेते असलेले सध्याचे काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना तेच आव्हान देऊ शकतील, असा तर्क त्यांच्या समर्थनार्थ दिला जात आहे. - बघेल हे लोकप्रिय असले तरी काँग्रेसमधील एका वजनदार गटाचा त्यांना मोठा विरोध आहे. या विरोधाचा फायदा घेऊन भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याची क्षमता बैस यांच्यामध्येच आहे, असे म्हटले जाते. 

...तरीही संधी मिळणार नगरसेवक, आमदार, सातवेळा रायपूरचे खासदार, केंद्रीय मंत्री अशी बैस यांची यशस्वी राजकीय कारकीर्द राहिली आहे. भाजपमध्ये ७५ वर्षे वयावरील व्यक्तीला पद दिले जात नाही, असा नियम आहे. बैस यांनी वयाची पंचाहत्तरी गाठली असली तरी अपवाद म्हणून त्यांना संधी द्यावी, यासाठी छत्तीसगड भाजपमधूनच आग्रह सुरू झाला असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Ramesh Baisरमेश बैसMaharashtraमहाराष्ट्रChhattisgarhछत्तीसगड