शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ओबीसींच्या अध्यादेशावरून राज्यपाल-सरकार संघर्ष, विधि व न्याय विभागाच्या शेऱ्यावर ठेवले बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 12:10 IST

अध्यादेश मंजुरीसाठी राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठविला असता राज्यपालांनी विधि व न्याय विभागाच्या एका शेऱ्यावर बोट ठेवत राज्य शासनाकडून खुलासा मागविला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन केले.

मुंबई : ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण पुन्हा बहाल करण्यासंबंधीच्या अध्यादेशावर सही न करता त्याबाबत काही विचारणा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्याने राज्यपाल विरुद्ध सरकार असे संघर्षाचे चित्र पुन्हा एकदा समोर आले. विशेष अधिवेशनावरून  ‘राजभवन विरुद्ध राज्य सरकार’ असा संघर्ष बघायला मिळाला होता. 

अध्यादेश मंजुरीसाठी राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठविला असता राज्यपालांनी विधि व न्याय विभागाच्या एका शेऱ्यावर बोट ठेवत राज्य शासनाकडून खुलासा मागविला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन केले. राज्यपाल हे ओबीसी विरोधी असल्याचे चित्र सत्तापक्षाकडून तयार केले जात आहे. उलट राज्यपालांनी केलेली विचारणा ही ओबीसी हिताची आहे. कारण, विधि व न्याय विभागाचे मत डावलून अध्यादेश काढल्यास तो न्यायालयात टिकणार नाही म्हणून ओबीसी हितासाठी राज्यपालांनी विचारणा केली, असे फडणवीस म्हणाले. राज्यपालांनी केलेल्या विचारणेवर उत्तर दिले असते आणि शक्ती कायदा आधीच राज्यात आणला असता तर परिपक्वता दिसली असती पण मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अपरिपक्व दिसतात, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. 

बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यपालांनी ओबीसींबाबतचा अध्यादेश परत पाठविणे हे ओबीसींचे आरक्षण घालविण्याचे भाजपचे प्लॅनिंग आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र, राज्यपालांवर टीका करणे योग्य नाही. त्यांनी काही विचारणा शासनाकडे केली आहे त्यानुसार त्यांना उत्तर दिले जाईल, असे सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र राज्यपालांवर ओबीसी अध्यादेश अडविल्याबद्दल टीका केली आहे.

शासनाचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले राजभवनावर- अध्यादेशासंदर्भात राज्यपालांनी विचारणा केलेल्या बाबींची पूर्तता करण्यासाठी शासनाचे वरिष्ठ अधिकारी सायंकाळी राजभवनवर गेले. राज्यपाल कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यामुळे आता अध्यादेश लवकरच काढला जाईल अशी शक्यता आहे. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी