शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ७९ व्या वर्षी केला 'शिवनेरी' किल्ला सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 11:36 IST

छत्रपती शिवराय हे पूजनीय आदर्श: भगतसिंह कोश्यारी

ठळक मुद्देराज्यपालांच्या हस्ते शिवकुंज येथे वृक्षारोपण

जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराज हे खरे पूजनीय आदर्श आहेत.   त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. शिवराय सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व नव्हते तर ते अवतारी पुरुष होते. सद्यस्थितीत राम, कृष्ण, गुरू गोविंदसिंग, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यायला हवेत, असे झाल्यास देशाकडे कोणी तिरप्या नजरेने पाहणार नाही, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.  

 छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांना अभिवादन करण्यासाठी  शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी रविवारी आले होते. हेलिकॉप्टरनेन येता वयाच्या ७९ वर्षी त्यांनी पायी चालत किल्ला सर केला. अशा प्रकारे पायी चढत शिवनेरीवर येणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. किल्ल्यावरून उतरताना देखील त्यांनी पायी उतरणे पसंत केले, यावेळी ते बोलत होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या समवेत आमदार अतुल बेनके, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पुरातत्त्व विभागाचे उपअधीक्षक डॉ. राजेंद्र यादव, उपवनसंरक्षक डॉ. जयरामे गौडा आदी  उपस्थित होते. किल्ले शिवनेरीची गडदेवता शिवाई देवीस पूजा अभिषेक करत त्यांनी आरती करून त्यांनी दर्शन घेतले. गडावरील विविध वास्तूंची माहिती घेत असतानाच त्यांनी गडावरील विविध वृक्षांची माहिती घेतली. शिवकुंज स्मारकात  राजमाता जिजाऊ आणि बालशिवबांच्या शिल्पापुढे राज्यपाल महोदय नतमस्तक झाले. शिवजन्मस्थळ इमारतीत त्यांनी शिवाजी महाराजांच्या पाळण्याचे तसेच शिवाजी महाराजांच्या शिल्पाचे पूजन केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते शिवकुंज परिसरात वृक्षारोपणदेखील करण्यात आले.       

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शिवनेरी किल्लेपर आकर अच्छा लगा. हम बहुत छोटे लोग है, हेलिकॉप्टरसे आते नही. शिवाजी महाराज इस किले पर पैदल आते थे, हम भी पैदल आहे है, ये पहाडी तो हमारे लिए कुछ भी नही है. 

माझ्यासाठी पुण्याईचा क्षणराज्याचे कोणीही मुख्यमंत्री किल्ले शिवनेरीवर पायी चालत आले नाहीत. त्यांनी पायी चालत यायला पाहिजे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राज्यपाल यांनी हा प्रश्न शेजारी असलेल्या आमदार अतुल बेनके यांना विचारा असे सांगितले. शिवनेरीवर कसे यावे, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. मी श्रद्धेपोटी पायी आलो असे ते म्हणाले. शिवनेरीवर येण्याचे नियोजन करताना तेथे पाऊस आहे. चिखल आहे, चढण आहे, असे  सांगत घाबरवले होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या दृष्टीने पुण्याईचा क्षण आहे.  

टॅग्स :Junnarजुन्नरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFortगड