शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 18:11 IST

OBC Reservation : आरक्षणाबाबत सरकारनं पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे.

मुंबई: मागील काही दिवसांपासून सुरू असलेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. यामुळे आता राज्यात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जम्मू-कश्मीरच्या उरीमध्ये सुरक्षा दलाकडून 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; 5 AK-47, 8 पिस्तूल आणि 70 ग्रेनेड जप्त

ओबीसी आरक्षणाच्या मुद्दायवर राज्य सरकारनं राज्यपालांकडे अध्यादेश पाठवला होता. पण, त्यात राज्यपालांनी काही त्रुटी काढल्या होत्या. त्यानतंर राज्य सरकारनं सुधारणा करुन सुधारित अध्यादेश पुन्हा राज्यपालांकडे पाठवला. त्यावर आता राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. दरम्यान, राज्यपालांनी ही फाईल आता राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्याकडे पाठवलीय. 

'विनाकारण इतक्या दिवस महाविकासआघाडी सरकारला बदनाम केलं'

ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीनं पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केल्यामुळे आता त्याचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अध्यादेशावर स्वाक्षरी केल्याबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे आभार मानले. 'राज्यपालांनी अध्यादेशातील काही त्रुती आम्हाला सांगितल्या होत्या. त्यात आम्ही सुधारणा करुन तो परत त्यांना पाठवला. आता या सुधारित अध्यादेशाला राज्यपालांनी मंजूर केलं, यासाठी आम्ही राज्यपालांचे आभारी आहोत', अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या तिघांना अटक, बाजारात 1 कोटींपेक्षा जास्त किंमत

आता पुढे काय ?आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर आता त्याचं कायद्यात रुपांतर होऊ शकतं. हा अध्यादेश कायमस्वरुपी पुढे न्यायचा असेल तर तो विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करावा लागेल. मात्र, आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर तीन महिने हा अध्यादेश लागू असणार आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी