व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या तिघांना अटक, बाजारात 1 कोटींपेक्षा जास्त किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 02:46 PM2021-09-23T14:46:57+5:302021-09-23T15:28:42+5:30

व्हेल माशाच्या उलटीचा परफ्यूम बनवण्यासह औषधांमध्ये वापर केला जातो.

Three arrested for selling rare whale ambergris, valued at over Rs 1 crore in the market | व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या तिघांना अटक, बाजारात 1 कोटींपेक्षा जास्त किंमत

व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या तिघांना अटक, बाजारात 1 कोटींपेक्षा जास्त किंमत

Next

कोची:एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची दुर्मिळ व्हेल अँबरग्रीस(व्हेल माशाची उलटी) विकल्याप्रकरणी कोचीमधून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पर्यावरण आणि वन विभागाने सांगितलं की, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

एका गुप्त माहितीच्या आधारे, लक्षद्वीपच्या वन अधिकाऱ्यांचे एक पथक ऑपरेशनसाठी कोचीला रवाना झाले होते. लक्षद्वीपच्या वन अधिकाऱ्यांनी व्हेल अँबरग्रीस विकल्याबद्दल कोचीच्या बेटांवरून बुधवारी तीन जणांना अटक केली आहे. तसेच, त्यांच्याकडून 1.4 व्हेल अँबरग्रीस(1 किलो ब्लॅक अँबरग्रीस आणि 400 ग्रॅम व्हाईट अँबरग्रीस) जप्त करण्यात आली असून, बाजारात याची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळत आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत व्हेल माशाची उलटी विकण्यास बंदी आहे.

पंजाब पोलिसांची मोठी कारवाई, शस्त्र आणि स्फोटकांसह 3 दहशतवादी अटक
 

काय आहे व्हेल अँबरग्रीस?
व्हेल माशाच्या उलटीला अँबरग्रीस म्हटले जाते. हा पदार्थ व्हेल माशाच्या पोटातून निघतो. व्हेल मासा समुद्रात बऱ्याच वस्तु खातो, यातील काही पचतात तर काही पचत नाहीत. ज्या वस्तु पचत नाहीत, त्या उलटीतून बाहेर पडतात. या वस्तुंचा मेणासारखा गोळा तयार होतो उलटीवाटे बाहेर पडतो. 

'विनाकारण इतक्या दिवस महाविकासआघाडी सरकारला बदनाम केलं'
 

का महाग विकली जाते उलटी ?
ही उळटी व्हेल माशांच्या पाचन तंत्राद्वारे तयार केली जाते. या उलटीतून दुर्गंधी येत असली तरी याचा उपयोग परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो. यामुळे परफ्यूम शरीरावर जास्त काळ टिकतो. म्हणूनच परफ्यूम कंपन्या ही उलटी महाग किंमतीत विकत घेतात. या व्यतिरिक्त या अँबरग्रीसचा सेक्सशी संबंधित औषधांसाठी वापर केला केला जातो, म्हणूनच याची किंमत खूप जास्त आहे.

Web Title: Three arrested for selling rare whale ambergris, valued at over Rs 1 crore in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.