सरकारची फक्त ट्विटरवरुन टिवटिव - सुनील तटकरे
By Admin | Updated: August 27, 2016 18:07 IST2016-08-27T18:07:59+5:302016-08-27T18:07:59+5:30
सिंचन प्रकल्पांच्या कामांची चौकशी लवकर पूर्ण व्हावी व सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली

सरकारची फक्त ट्विटरवरुन टिवटिव - सुनील तटकरे
>- ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 27 - आघाडी सरकारच्या काळात बांधण्यात आलेल्या विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांची चौकशी सुरू आहे. या चौकशीत माझेही नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही चौकशी सुरू असून आपण चौकशीला पूर्णपणे सहकार्य करीत आहोत. ही चौकशी लवकर पूर्ण व्हावी व सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
तटकरे म्हणाले, राज्य सरकार फक्त ट्विटरवरुन टिवटिव करते. प्रत्यक्ष फिल्डवर जावून प्रश्न समजून घेत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. आगामी नगर पंचायत, जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले आहेत. काँग्रेसने तयारी दर्शविली तर सोबत लढू अन्यथा स्वतंत्र लढण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता आपल्याला जनता साथ देणार नाही याचा अंदाज आल्यामुळेच सरकारने आगामी निवडणुकीत नगर परिषदेचा नगराध्यक्ष थेट निवडण्याचा तसेच महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला असल्याची टीकाही त्यांनी केली.