आयुक्तांना धमकी हे सरकारचे अपयश
By Admin | Updated: February 15, 2017 03:25 IST2017-02-15T03:25:31+5:302017-02-15T03:25:31+5:30
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाणे ही अतिशय गंभीर बाब असून, त्यांना धमकी देणारा कोण

आयुक्तांना धमकी हे सरकारचे अपयश
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाणे ही अतिशय गंभीर बाब असून, त्यांना धमकी देणारा कोण आहे हे शोधून काढण्याकरिता चौकशी का झाली नाही, असा सवाल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. आयुक्तांना धमकी येणे हे सरकारचे अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला.
शनिवारी ठाण्यातील उपवन येथील प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात विविध स्वरूपाची विकासकामे करणाऱ्या आणि दलालांची दुकाने बंद करणाऱ्या आयुक्त संजीव जयस्वाल यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचा गौप्यस्फोट केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही आयुक्तांना धमक्या येण्याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत आयुक्तच असुरक्षित असतील तर इतरांचे काय, असा सवाल केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांवर पलटवार करताना शिंदे यांनी हे सरकारचे अपयश असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)