प्राचीन वेदांच्या संवर्धनासाठी सरकार काम करेल - मुख्यमंत्री

By Admin | Updated: December 23, 2016 20:28 IST2016-12-23T20:28:53+5:302016-12-23T20:28:53+5:30

प्रकृतीच्या सूत्राला आमच्यापर्यंत पोहचविण्याचे, उत्पत्तीचा विनाश याची कारणमीमांसा सांगणारे, प्रकृतीचे संवर्धन, व्यक्ती-समाज-राष्ट्राला कुठल्या दिशेने जावे हे मूल्य वेदाने

The government will work for the conservation of ancient Vedas - Chief Minister | प्राचीन वेदांच्या संवर्धनासाठी सरकार काम करेल - मुख्यमंत्री

प्राचीन वेदांच्या संवर्धनासाठी सरकार काम करेल - मुख्यमंत्री

>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.23 - प्रकृतीच्या सूत्राला आमच्यापर्यंत पोहचविण्याचे, उत्पत्तीचा विनाश याची कारणमीमांसा सांगणारे, प्रकृतीचे संवर्धन, व्यक्ती-समाज-राष्ट्राला कुठल्या दिशेने जावे हे मूल्य वेदाने आम्हाला दिले आहे. वेद हे चिरंतर आहे. जगात शाश्वत विकासाची चर्चा होत असताना, प्रकृतीचे शोषण करू नये हे वेदांनी फार पूर्वीच सांगितले आहे. वेदातील वैज्ञानिक विचारांचा समाज आणि जगात प्रचार प्रसार व्हावा, समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत वेदातील विज्ञान पोहचावे, वेदातील भ्रांती दूर व्हावी, यासाठी प्राचीन वेदांच्या संवर्धनासाठी सरकार काम करेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 
धर्मसंस्कृती महाकुंभात महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानतर्फे वेद महर्षी विनायकभट्ट घैसास गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय वेद संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. संमेलनाला ज्योतिषपीठाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, श्री देवनाथपीठाचे जितेंद्रनाथ महाराज, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य, महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानचे डॉ. रवींद्र मुळे, वेदाचार्य घैसास गुरुजी जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष डॉ. किशोर मिश्र, आयोजक मोरेश्वर घैसास, निमंत्रक कृष्णाशास्त्री आर्वीकर आदी उपस्थित होते. 

Web Title: The government will work for the conservation of ancient Vedas - Chief Minister