डाळ घोटाळ्याचा सरकारला जाब विचारणार
By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:26+5:302015-12-05T09:07:26+5:30
डाळ घोटाळ्यात फक्त अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापटच नाही, तर आणखी काही मंत्री सहभागी असल्याची काँग्रेसची माहिती आहे. हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला

डाळ घोटाळ्याचा सरकारला जाब विचारणार
पुणे : डाळ घोटाळ्यात फक्त अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापटच नाही, तर आणखी काही मंत्री सहभागी असल्याची काँग्रेसची माहिती आहे. हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला काँग्रेस याचा जाब विचारेल, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
ऐन दिवाळीत राज्य सरकारने डाळ महाग केली. हा ठरवून केलेला प्रकार आहे. कोणाच्या तरी मोठया आर्थिक फायद्यासाठी हे सर्व केले गेले. काँग्रेस त्याची माहिती घेत आहे. काही नावेही समोर येत आहेत. अधिवेशनात सरकारला याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे विखे म्हणाले. मंत्री म्हणून ही सर्व जबाबदारी बापट यांचीच आहे. ती स्वीकारुन त्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी विखेंनी केली.