शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीशिवाय हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 22:00 IST

या सरकारच्या पायाखालची जामीन सरकली आहे. त्यामुळे आता आयोध्याच्या मुद्दा पुढे करून देशात दंगली भडकवण्याचे काम सुरु झाले आहे.

पुणे - या सरकारच्या पायाखालची जामीन सरकली आहे. त्यामुळे आता आयोध्याच्या मुद्दा पुढे करून देशात दंगली भडकवण्याचे काम सुरु झाले आहे. या सरकारला दंगली शिवाय पुन्हा सत्तेवर येत येणार नाही त्यामुळे दंगली होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी असा कानमंत्र ऍड प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान दिनी संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या सभेला एम आय एम चे आमदार इम्तियाज जलील, लक्ष्मण माने तसेच इतर वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्तिथ होते. आंबेडकर म्हणाले,  26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. सर्वोच न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सुद्धा हा दिवस साजरा केला. गेल्या 70 वर्षांमध्ये सर्वोच नायलयाच्या न्यायाधीशांनी जाहीरपने संविधान दिन साजरा केल्याचे ऐकवत नाही. यंदा मात्र त्यांनी हा दिवस जाहीर साजरा करून संविधान विरोधी लोकांना पुन्हा निवडून देऊ नका असाच आदेश दिला आहे.     नोटा बंदीनंतर काळ्या नोटा कश्या बदलून दिल्या ते मोदींनी सांगायला हवं. नोटबंदीमध्ये 60-40 चा तुमचा सौदा होता. जलील तुमच्यावर केस झाली तर मी वकील होईल त्यातून मला मोदींना कोर्टात आणता येईल. तुमच्यावर केस झाली तर माझा पहिला साक्षीदार हे नरेंद्र मोदी असतील. कारण साक्षीदाराला काहीही विचारता येतं. या देशात टॅक्स न भरण हा एक व्यवहार आहे. त्याकडून टॅक्स घेणं योग्य आहार परंतु त्याला लुटलं जातंय. नोटा बदलण्याचा निर्णय उर्जित पटेलांचा होता. अरुण जेटली म्हणतायेत 6 महिने चालेल इतकंच गंगाजल आहे. 6 महिन्यांची गंगाजल आहे तर अरबीआय कडे पैसे मागण्यास का गेलात. एन पी ए मधील 80 टक्के पैसे परत येणार नाहीत अशी परिस्तिथी आहे. 2019 ला हे सरकार आलं तर तुमचं बँकेतील खाते बुडेल. सरकारकडे पैसे नसल्याने लोकांना पैसे बँकेतून काढण्यावर बंधने येत आहेत. मनुवाद आणायचा असेल तर लोक आर्थिक दृष्ट्या कमकुवत असावे लागतात. त्यामुळे मनुवाद आणण्यासाठी सरकार लोकांना आर्थिक दृष्ट्या कमकुवत करत आहे. परत आलेल्या नोटा किती होत्या हे सांगण्यासाठी दीड वर्ष का लागला असा प्रश्न आहे. मोदींनी नोटा बदलण्यासाठी 31 डिसेंम्बरची तारीख दिली पण एन आर आय लोकांना 31 मे पर्यंतची मुदत कशी दिली. मोगलाई मराठे म्हणतात आपल्या सत्तेत वाटा नको म्हणून ते 12 जागा देखील द्यायला तयार नाहीत. काँग्रेस आणि बी जे पी चं नातं काय आहे ते मला माहितीये. मला काही वेगळी दूषणं लावता येत नाही म्हणून काँग्रेस मला बिकाऊं म्हणते. सिंचन घोटाळ्यामध्ये कोण मंत्री आहेत त्याचं नाव मुख्यमंत्री उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पिठाला सांगत नाही. मक्तेदारांची सत्ता गाडून टाकायला हवी. काँग्रेसला वाटते तेच केवळ सेक्युलर आहेत. 4 राज्यांच्या निवडणुकीनंतर चित्र वेगलं असेल. 

आयोध्याच्या विषयामुळे दंगल होईल. पोलीस म्हणताईत मला संरक्षण घ्या. कारण त्यानां माहितीये कि दंगल होणार आहे. दंगलीशिवाय या सरकारकडे काही राहिलेलं नाही. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे दंगल होणार नाही याची दक्षात आपण घ्यायला हवी.  मोदींच्या चेहऱ्यावरची रोनाक गेलीये आता चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. चिंतेने ग्रासलेला माणूस काहीही करू शकतो. म्हणून आता आयोद्धचा प्रश्न उपस्तिथ केला जात आहे. एक माहोल तयार केला जातोय. हा माहोल दंगलीसाठी तयार केली जात आहे. दंगलीशिवाय या सरकारला पून्हा सत्तेवर येता येणार नाही. या देशात बदल आणायचा असेल तर संविधानिक मार्गाने आणायला हवा.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणBJPभाजपा