शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या संरक्षणासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करणार, सरकारची हायकोर्टाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 12:39 IST

या कक्षात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अन्य भागधारकांचा समावेश असेल, अशी माहिती महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली. 

मुंबई : रुग्णांच्या नातेवाईकांच्या पोलीस तक्रारीपासून आणि गुन्ह्यापासून वाचविण्याकरिता तज्ज्ञांचा विशेष कक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू  आहे, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला बुधवारी दिली.या कक्षात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अन्य भागधारकांचा समावेश असेल, अशी माहिती महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली. हे पॅनल डॉक्टर व रुग्णालयाविरोधात वैद्यकीय हलगर्जीपणासंदर्भातील तक्रारींची तपासणी करेल. त्यानंतर एखादी तक्रार दखल घेण्याजोगी असेल तर त्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांविरोधात रुग्णालयात घुसखोरी करून रुग्णालयाच्या संपत्तीचे नुकसान, डॉक्टरांवर हल्ला केल्याची तक्रार केली तर आयपीसी अंतर्गत हे प्रकरण हाताळण्यात येईल, अशी माहिती कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली.वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यास हे पॅनल तक्रारीवरून गुन्हा नोंदवणे आवश्यक आहे की नाही, हे तपासेल. या पॅनलची नियुक्ती पुढील आठवड्यापर्यंत करण्यात येईल, अशी माहिती कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने राज्य सरकारचे म्हणणे स्वीकारत सूचना केली की, एमबीबीएस डिग्री घेतलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांचाही यात समावेश करा. 

जनहित याचिका डॉक्टरांच्या संरक्षणासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखावीत, यासाठी पुण्याचे डॉ. राजीव जोशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेनुसार, देशात सर्वात जास्त हल्ले महाराष्ट्रात होतात. राज्य सरकार अस्तित्वात असलेल्या कायद्याचे प्रभावीपणे पालन करण्यास अपयशी ठरले आहे. या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टरUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारHigh Courtउच्च न्यायालय