शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ; जाहीर माफी मागावी - सुनिल तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 22:28 IST

नागपूर  – इयत्ता ६ वीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती भाषेत धडे शासनाने प्रसिद्ध केल्याची माहिती आमदार सुनिल तटकरे यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे उपस्थित करुन सरकारने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. सरकारच्या या बेगडी मराठीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाचे कामकाज अर्धा तासासाठी स्थगित करण्यात आले.महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक ...

नागपूर  – इयत्ता ६ वीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती भाषेत धडे शासनाने प्रसिद्ध केल्याची माहिती आमदार सुनिल तटकरे यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे उपस्थित करुन सरकारने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. सरकारच्या या बेगडी मराठीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाचे कामकाज अर्धा तासासाठी स्थगित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी प्रकाशित केलेल्या सहावीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती भाषेचा वापर करण्यात आला असून हा मराठी भाषेचा अपमान असल्याचे सांगत सरकारने दिलगिरी व्यक्त करुन जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. मराठी भाषेचा अपमान असून सरकार किती लाचारी करणार ? हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ नाही का  संतप्त सवालही  सुनिल तटकरे यांनी सभागृहात केला.

दरम्यान या गंभीर विषयावर जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी याबाबत सरकारने खुलासा करावा आणि तात्काळ दुरुस्ती करावी असे निर्देश सरकारला दिले.

तटकरे यांनी हा मुद्दा उपस्थित करताच राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले. गुजरातसमोर आणखी किती लाचारी पत्करणार, महाराष्ट्राचे गुजरातीकरण सुरु आहे, असा आरोप आमदारांनी केला. या गदारोळामुळे विधान परिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले. कामकाज सुरु झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी याच मुद्द्यावरुन घोषणाबाजी सुरु केली. अखेर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करावे लागले.

टॅग्स :nagpurनागपूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस