सरकारमुळेच साठेबाजांचे फावले - मुंडे
By Admin | Updated: October 9, 2015 02:14 IST2015-10-09T02:14:16+5:302015-10-09T02:14:16+5:30
केंद्र सरकारने चार महिन्यापूर्वी कळवूनही राज्य सरकारने उपाययोजना न केल्यामुळे डाळींचे भाव गगनाला भिडून साठेबाज व्यापाऱ्यांचे फावले आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते

सरकारमुळेच साठेबाजांचे फावले - मुंडे
मुंबई : केंद्र सरकारने चार महिन्यापूर्वी कळवूनही राज्य सरकारने उपाययोजना न केल्यामुळे डाळींचे भाव गगनाला भिडून साठेबाज व्यापाऱ्यांचे फावले आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
राज्यातील वाढत्या महागाईला आळा घालण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असल्याचे सांगून मुंडे म्हणाले, गेल्या चार महिन्यात डाळींचे भाव दुपटीपेक्षा अधिक वाढले असून त्यास मुख्यमंत्री स्वत: जबाबदार आहेत. डाळीचे दर नियंत्रणात ठेवणे आणि साठेबाजी रोखण्यासाठी प्राईस मॉनिटरींग सेल स्थापन करावा असे केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाने राज्य सरकारला कळवले असतानाही सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. राज्यात प्राईस मॉनिटरींग सेल स्थापन करण्याच्या निर्देशांची अंमलबजावणी तातडीने व्हावी, डाळींसह सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या साठ्याची मर्यादा जाहीर करण्यात यावी, साठेबाजांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून डाळी, तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचे माफक
दरात वितरण करण्यात यावे,
अशी मागणीही त्यांनी केली
े. (विशेष प्रतिनिधी)