शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

सरकारने इव्हेंटवर खर्च करण्यापेक्षा वृक्ष संवर्धनावर खर्च करावा, खासदार शिंदेचे भाजपावर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 6:57 PM

एका आठवड्यात दोन वेळेस दोन विविध ठिकाणी वृक्ष जळाल्याच्या घटना घडल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी थेट भाजपा सरकारलाच टारगेट केले आहे. वृक्ष लागवडीच्या इव्हेंटवर खर्च करण्यापेक्षा वृक्ष संवर्धनासाठी खर्च करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देमी राख फेकलीच नाही - श्रीकांत शिंदे आठवड्यात दुसऱ्यांदा वृक्ष जाळपोळीचे प्रकरण

ठाणे - सरकारने इव्हेंटवर खर्च करण्यापेक्षा वृक्ष संवर्धनावर खर्च केला पाहिजे असा आरोप कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. राज्यात १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. परंतु त्यातील किती वृक्ष जगले हा संशोधनाचा विषय असून या सर्वाचे थर्ड पार्टी आॅडीट झाले पाहिजे, दोषींना जन्मठेपेची शिक्षा व्हावी आणि मंगरुळ आणि खुंटवली वृक्ष जाळपोळ प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.                मागील आठवड्यात अंबरनाथ येथील मंगरुळ गावातील वृक्ष जाळपोळ प्रकरण ताजे असतांना शुक्रवारी पुन्हा अंबरनाथ भागातीलच खुंटवली गावातील सुमारे २५ हजार वृक्ष जाळाल्याची घटना घडली आहे. या घटनांमागे भुमाफीया, वीटभट्टी माफीया आणि वन अधिकाऱ्यांची अभद्र युतीमुळेच या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप त्यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. वनविभागाने वेळीच काळजी घेतली असती तर आज ही वेळ आली नसती, त्यामुळे जे या प्रकरणात दोषी असतील त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.            वणवा लागल्याने किंवा काही समाजकंटाकडून हे कृत्य होत असतांना त्याची साधी चौकशीसुध्दा वनविभागाकडून केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात वर्षभरात १०० हून अधिक अशा घटना घडल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड केली असली तरी त्यातील १३ लाख वृक्ष तरी जगले आहेत का? याबाबत शंका उपस्थित होत असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच सरकारने वृक्ष लागवडीचे इव्हेंट करण्यापेक्षा वृक्ष संवर्धन खर्च करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील १३ कोटी वृक्षांचे थर्ड पार्टी आॅडीट केले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे. टप्याटप्याने १३ कोटी वृक्ष नष्ट करण्यासाठी मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याशिवाय दोषी असलेल्या वनअधिकाºयांवर कारवाई झाली पाहिजे. परंतु जर वन विभागाला वृक्षांचे संरक्षण करता येत नसेल तर त्यांनी हे खातेच बंद करावे अशी टिकाही त्यांनी केली आहे. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी माझ्या विरोधात निषेध आंदोलन करीत आहेत, त्यामुळे मी जर दोषी असेल तर त्यांनी माझ्यावर खुशाल ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल करावेत मी काही त्याला भीत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मी राख फेकलीच नाही...ज्या दिवशी वनविभागाच्या अधिकाºयांच्या कार्यालयात आंदोलन झाले. त्यावेळेस मी राख फेकलीच नसल्याचे स्पष्टीकरण आता शिंदे यांनी केले आहे. ज्यावेळेस राख फेकली गेली तेव्ही मी बाहेर होतो. जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा या प्रकरणी मी वनअधिकाºयांची दिलगीरीसुध्दा व्यक्त केली आहे.दोन ठिकाणी ५० हजारांच्या आसपास वृक्षांची जाळपोळमंगरुळ आणि खुंटवली भागात जवळपास ५० हजार वृक्ष जाळण्यात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी दोषी अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून १९ डिसेंबर २०१७ मध्ये आणि १९ नोव्हेंबर २०१८ रोजी मागणी केली आहे. परंतु अद्यापही या प्रकरणांमध्ये कोणालाच अटक झालेली नसल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.जीओ टॅगींगचे केवळ कागदी घोडेवृक्ष लागवडीनंतर केवळ जीओ टॅगींग केली जात असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात जीओ टॅगींगचे केवळ कागदी घोडेच नाचविले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे अशा घटनांना आळा बसण्यासाठी येथील सुरक्षितता वाढविण्याबरोबरच या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.योग्य चौकशी न झाल्यास पुन्हा हजोरांच्या संख्येने आंदोलनवांरवार असे प्रकार घडत असतांनासुध्दा या प्रकरणात अद्यापही कोणावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडल्यास किंवा या प्रकरणांची तत्काळ चौकशी करुन कारवाई न केल्यास हजारोंच्या संख्येने पुन्हा जनआंदोलन उभारले जाईल असेही त्यांनी यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेShrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv Senaशिवसेना