शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने मस्तीत वागू नये, ज्या वेगानं सत्तेत आले त्याच वेगाने कोसळणार- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:02 IST

 सरकारविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपा सरकारची अधोगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे लक्षण आहे.

सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी भाजपा सरकार ज्या वेगाने सत्तेत आले आहे त्याच वेगाने कोसळेल असं भाकीत वर्तवलं आहे. 

शेतकऱ्याला बोगस म्हणणारे सरकारमधील मंत्री आणि त्यांचा पक्षच बोगस आहे. सरकारने जास्त मस्तीत वागू नये. जनता ही मस्ती उतरवू शकते. राज्यकर्त्यांची अशी मग्रुरी राज्याच्या इतिहासात कधी दिसली नाही.  राजकारणाची जी संस्कृती महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवारांपर्यंत पाहिली आजचे सत्ताधारी मात्र हा इतिहास कलंकित करत आहेत, असं अजित पवार म्हणाले.  

यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या दडपशाहीवरही जोरदार टीका केली.  सरकारविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपा सरकारची अधोगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे लक्षण आहे. त्यामुळे भाजपा सरकार ज्या वेगाने सत्तेत आले आहे, त्याच वेगाने कोसळेल असं पवार म्हणाले.

भाजपा सरकारच्या धोरणांवर जोरदार देखील त्यांनी टीका केली. जीएसटी आणि नोटबंदीवर टीका करताना ते म्हणाले, नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारची धोरणं ही केवळ उद्योगपतींचं भलं करणारी आहेत. राज्यातही सरकारची शेतकऱ्यांबाबतची धोरणं चुकत आहेत असं म्हणत त्यांनी शेतकऱ्याला बोगस म्हणणारे सरकारमधील मंत्री आणि त्यांचा पक्षच बोगस आहे. कर्ज घेण्यास शेतकरी अपात्र असू शकतो, पण सात बारा असणारा शेतकरी बोगस कसा असू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार