सरकारने मतविभाजन घ्यायला हवे होते

By Admin | Updated: November 16, 2014 01:13 IST2014-11-16T01:13:17+5:302014-11-16T01:13:17+5:30

विधानसभेत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजप सरकार वाचल्याची चर्चा असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विश्वासदर्शक ठरावाववर मतविभाजन घ्यायला हवे होते,

The government should have got divisions | सरकारने मतविभाजन घ्यायला हवे होते

सरकारने मतविभाजन घ्यायला हवे होते

पुणो : विधानसभेत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजप सरकार वाचल्याची चर्चा असताना  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विश्वासदर्शक ठरावाववर मतविभाजन घ्यायला हवे होते, असे प्रतिपादन केले आहे. राज्यात त्रिशंकू परिस्थिती असल्याने नव्या सरकारला किती आमदारांचा पाठिंबा आहे, किती जणांचा विरोध आणि किती तटस्थ आहेत, हे लोकांना कळायला पाहिजे होते, असे  ते म्हणाले.
  राज्याच्या हिताचा निर्णय असेल तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ़ आम्हाला वाटले की हे राज्याचे हिताचे नाही, त्याला विरोध करू, असे त्यांनी.  फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाविषयी विचारलेल्या प्रश्नांवर पवार म्हणाले,  की लगेच निवडणुका कोणालाही परवडणा:या नाहीत. म्हणून स्थिर सरकारसाठी आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला आह़े तरीही या सरकारला किती जणांचा पाठिंबा आहे, हे लोकांना कळायला पाहिजे होते, म्हणजे आज जो संभ्रम आहे, तो झाला नसता़ सरकारने ते केले नाही़  विश्वासदर्शकाच्या वेळी काहींनी सभात्याग केला़ त्याचवेळी अध्यक्षांनी ठरावाला कोणाचा पाठिंबा आहे, याची विचारणा केली़ गोंधळातच ‘हो’ चा पुकारा झाला़ सरकारचे फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित नाही़ सरकारने विश्वासदर्शक ठराव व्यवस्थित सहमत करून घेतला असताना तर नंतर राज्यपालांसमोर गोंधळ झाला नसता.

 

Web Title: The government should have got divisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.