शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

"सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, फक्त थोडा वेळ लागेल", भाजप नेत्याचं मनोज जरांगेंना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 17:54 IST

आरक्षणाची घोषणा न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असे म्हणत सरकारला आता एक तासाचा वेळ वाढवून देणार नसल्याचा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे. तसेच, आरक्षणाची घोषणा न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. आरक्षण देईल तर हेच सरकार देईल. फक्त त्यासाठी थोडा वेळ लागेल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.  नाशिकमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी, मनोज जरांगे यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती. आम्ही न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली समितीचे वेगाने काम सुरु असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. 

मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला थोडा वेळ द्यावा. कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी कायदेशीर आधार द्यावा लागेल. त्यासाठी अजूनही थोडा वेळ लागेल. चर्चा सुद्धा सुरू राहिली पाहिजे, चर्चेतून मार्ग निघेल. पुन्हा उपोषणाला बसून, शरीराला ताण देऊन फार काही उपयुक्तता होणार नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.

याचबरोबर, सरसकट आरक्षणाची काही आवश्यकता नाही. पण मराठवाड्यात त्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समिती अभ्यास करत आहे. अजून किती दिवस लागेल, हे मला सांगता येणार नाही. आमच्या सरकारवर लोकांचा विश्वास आहे. त्याचमुळे आमच्या सरकारच्या काळात मोर्चे निघत आहेत. सरकार त्याची दखल घेत आहे. मात्र, याबाबतीत तोडगा काढायला थोडा वेळ लागेल, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले. 

सरकारला आता एक तासाचा वेळ वाढवून देणार नाही, जरांगे-पाटील यांचा इशारादसऱ्याचे औचित्य साधून अहमदनगरच्या चौंडी येथे धनगर समाजाकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. असे म्हणत सरकारला आता एक तासाचा वेळ वाढवून देणार नसल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, जरांगे-पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी आज संध्याकाळपर्यंतचा वेळ दिला आहे. सरकारने आज संध्याकाळपर्यंत आरक्षण दिले नाही तर त्यांनी आमच्या दारातही यायचं नाही, असेही स्पष्टपणे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण