शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिलमाफीच्या वादावरून सरकार-विरोधकांमध्ये जुंपली; राज ठाकरेंची भूमिका आज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 06:01 IST

Mahavitaran: महावितरणची आजवरची एकूण थकबाकी ५० हजार कोटींच्या घरात जाण्यास आधीचे भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाऊनच्या काळात आलेली वाढीव वीज बिले माफ केली जाणार नाहीत, असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून सत्तारुढ आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. महावितरणची आजवरची एकूण थकबाकी ५० हजार कोटींच्या घरात जाण्यास आधीचे भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला.  ‘आधी घोषणा करता मग घूमजाव करत तोंड लपवता, ताकद असेल तर वीज बिल माफ करून दाखवा, असे आव्हान विधानसभेचे विरोधी पक्षेनते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.राऊत यांनी असा आरोप केला की, कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. तर राऊत चुकीची माहिती देत आहेत. आता पैसा नसल्याचे कारण देत बिल माफी देणार नाही, असे सांगत असल्याचा हल्लाबोल फडणवीस यांनी केला. 

महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने सर्वसाधारण कार्यक्षमता न दाखविल्याने व वीज बिलांची वसुली न केल्याने बसला आहे. भाजपच्या काळात महावितरणची एकूण थकबाकी ५० हजार कोटींच्या घरात गेली. - नितीन राऊत, ऊर्जामंत्री

एसटीला मदत देता, मग...ऊर्जा विभागाच्या निर्णयावर मंत्रिमंडळात चर्चा होईल. वीज बिलाबाबत लोकभावना तीव्र आहेत, लोक भेटून आम्हाला निवेदने देत आहेत. राज्य सरकारने एसटी महामंडळाला मदत केली. त्याप्रमाणे गरज पडल्यास वाढीव वीज बिलाचा भुर्दंड सोसाव्या लागणाऱ्या लोकांनाही मदत झाली पाहिजे. -विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन मंत्री

शिवसेनेकडून पलटवारवाढीव वीज बिलाबाबत नितीन राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, पण भाजप या मुद्द्यावरून लोकांना भडकविण्याचे काम करीत आहे. भाजपच्या काळात थकबाकी वाढल्याने महावितरणला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. - सुनील प्रभू, आमदार, शिवसेना

सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. आधी वीज बिल माफीची घोषणा केली. आम्ही निर्णय घेतला आहे, असेही बोलले. पाच वर्षांचे मिळून येणार नाहीत, अशी बिले तीन महिन्यांत लोकांना आली, तरीही ती दुरुस्त केली गेली नाहीत. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

वीज बिल भरू नये. ग्राहकांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्यांनी रद्द केला याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, नेते, वंचित बहुजन आघाडी

राज ठाकरेंची भूमिका आजवाढीव वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे. मनसेची या संदर्भात गुरुवारी मुंबईत बैठक होणार असून तीत या बाबतची भूमिका ठरेल. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Rautनितीन राऊत