शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
3
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
4
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
5
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
6
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
7
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
8
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
9
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
10
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
11
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
12
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
13
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
14
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
15
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
16
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
17
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
18
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
20
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
Daily Top 2Weekly Top 5

७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 06:30 IST

११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वे लोकल गाड्यांमध्ये विविध स्थानकांवर सात साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यात १८० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.

नवी दिल्ली :मुंबईत पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी साखळी बॉम्बस्फोट (७/११चे बॉम्बस्फोट) झाले होते. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सर्व १२ आरोपींची पुरावे निर्णायक नसल्याच्या कारणावरून सोमवारी निर्दोष मुक्तता केली होती. या निकालाविरोधात महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या अपीलावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी, २४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.सरन्यायाधीश भूषण गवई, न्या. के. विनोद चंद्रन आणि न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने मंगळवारी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटला निकालाबाबत केलेल्या तातडीच्या उल्लेखाची दखल घेतली आणि या प्रकरणाची गुरुवारी सुनावणी घेण्याचे ठरवले. मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात विशेष सुट्टीकालीन याचिका तयार असून तिची उद्या, बुधवारी दखल घ्यावी. या याचिकेवर तातडीने सुनावणी व्हायला हवी. या प्रकरणात आणखी काही महत्त्वाच्या बाबी तपासणे आवश्यक आहे. त्यावर सरन्यायाधीश गवई यांनी या निकालासंदर्भात प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांचाही उल्लेख केला.मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अनिल किलोर व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात म्हटले आहे की, मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या बॉम्बचा वापर करण्यात आला, याची माहितीच तपास यंत्रणेने सादर केलेली नाही. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळ, आरोपींकडून जप्त केलेले साहित्य व कबुलीजबाब यांच्या हस्ते या प्रकरणाचा खटला चालविण्यात आला. पण आरोपींनीच बॉम्बस्फोट घडविला, हे पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) सिद्ध करू शकलेले नाही. त्यामुळे या खटल्यातील १२ आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या आरोपींपैकी ५ जणांना विशेष न्यायालयाने फाशीची तर उर्वरित ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. फाशीची शिक्षा सुनावलेल्यांपैकी एकाचा २०२१मध्ये मृत्यू झाला. ११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वे लोकल गाड्यांमध्ये विविध स्थानकांवर सात साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यात १८० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी विशेष न्यायालयाने २०१५ साली दिलेल्या निकालाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल झाले. या प्रकरणातील आरोपींना सुनावलेल्या शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द करून त्यांची मुक्तता केली. या निकालामुळे सदर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) मोठा धक्का बसला आहे. या पथकाने न्यायालयात दावा केला होता की, २००६ साली मुंबईत घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी हे बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेचे सदस्य आहेत. त्यांनी पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबाच्या (एलइटी) सदस्यांशी हातमिळवणी करून साखळी बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला.जबाब घेताना शारीरिक छळ केल्याचा आरोपींचा दावा११ जुलै २००६ रोजी मुंबईतील लोकल गाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सरकारी वकिलांनी सादर केलेले पुरावे निर्णायक नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते. तसेच सरकारी पक्षाने सादर केलेले सर्व कबुलीजबाब उच्च न्यायालयाने अमान्य केले. तपास यंत्रणेने जबाब घेताना आरोपींचा शारीरिक छळ केला हे त्यांनी सिद्ध केल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :Mumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटMumbaiमुंबईBombsस्फोटकेBlastस्फोटCourtन्यायालय