‘डीपी’त सरकारचा हस्तक्षेप
By Admin | Updated: April 7, 2015 04:57 IST2015-04-07T04:57:46+5:302015-04-07T04:57:46+5:30
मुंबई महापालिकेने तयार केलेल्या डीपी प्लॅनबद्दल (विकास आराखडा) येत असणाऱ्या असंख्य तक्रारी आणि वाढत्या नाराजीची दखल घेत अखेर सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘डीपी’त सरकारचा हस्तक्षेप
मुंबई : मुंबई महापालिकेने तयार केलेल्या डीपी प्लॅनबद्दल (विकास आराखडा) येत असणाऱ्या असंख्य तक्रारी आणि वाढत्या नाराजीची दखल घेत अखेर सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर आणि पुण्याच्या नगररचना संचालनालयाचे संचालक यांची एक समिती स्थापन करून अधिवेशन संपण्याच्या शेवटच्या दिवशी समितीचा प्राथमिक अहवाल सादर
केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय मुंबईकरांना न्याय देणारा आहे,
अशी प्रतिक्रि या मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)