सरकारने साखर कारखाने चालवावेत
By Admin | Updated: August 30, 2015 01:23 IST2015-08-30T01:23:02+5:302015-08-30T01:23:02+5:30
दुष्काळी परिस्थितीमुळे ओढवलेले पाणी संकट आणि कारखान्यांना बँकांकडून पूर्वहंगामी कर्ज उपलब्ध न झाल्यामुळे यंदा मराठवाड्यातील उसाचे गाळप करणे अवघड आहे.

सरकारने साखर कारखाने चालवावेत
औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे ओढवलेले पाणी संकट आणि कारखान्यांना बँकांकडून पूर्वहंगामी कर्ज उपलब्ध न झाल्यामुळे यंदा मराठवाड्यातील उसाचे गाळप करणे अवघड आहे. त्यामुळे यावर्षी सरकारने साखर कारखाने चालवावेत किंवा ऊस उत्पादकांची गैरसोय टाळण्यासाठी ऊस इतरत्र नेण्याची व्यवस्था करावी, असा विनंतीवजा ठराव मराठवाड्यातील साखर कारखानदारांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला.
राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील सहकारी व खासगी साखर कारखानदारांची बैठक शनिवारी राज्य सहकारी बँकेच्या सभागृहात घेण्यात आली.
या बैठकीला सहकारी क्षेत्रातील २२ आणि खासगी क्षेत्रातील १७ कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)