शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारमधून इंग्रजी हद्दपार, सरकारने काढला मराठी सक्तीचा आदेश 

By यदू जोशी | Updated: May 8, 2018 06:06 IST

कार्यालयांत अधिकारी इंग्रजीचा वापर बंद करून प्रशासनात मराठी सक्तीचा आदेश राज्य सरकारने सोमवारी काढला. प्रत्येक कार्यालयात मराठीचा पूर्ण वापर होतो का, हे पाहण्यासाठी मराठी भाषा दक्षता अधिकारी नेमण्याचे आदेशही दिले आहेत.

मुंबई : कार्यालयांत अधिकारी इंग्रजीचा वापर बंद करून प्रशासनात मराठी सक्तीचा आदेश राज्य सरकारने सोमवारी काढला. प्रत्येक कार्यालयात मराठीचा पूर्ण वापर होतो का, हे पाहण्यासाठी मराठी भाषा दक्षता अधिकारी नेमण्याचे आदेशही दिले आहेत.योजनांची माहिती सामान्यांना देताना वा त्याची चर्चा करताना तसेच दूरध्वनीवरून बोलताना सर्व अधिकारी वा कर्मचाºयांनी मराठीचाच वापर करणे बंधनकारक असेल.वारंवार सूचना देऊनही ज्या सरकारी अधिकारी व कर्मचाºयांकडून मराठीचा वापर करण्याबाबत सुधारणा होत नाही, त्यांना लेखी ताकद देणे, गोपनीय अहवालात तशी नोंद करणे, एक वर्षासाठी बढती वा वेतनवाढ रोखणे, अशी कारवाई केली जाणार आहे. या कारवाईचा शासकीय आदेश आधीपासूनच आहे. आता त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल.इंग्रजी शेºयांना बंदीअधिकारी फायलींवर इंग्रजीतूनच शेरे लिहितात. त्यांना मराठी शेरे द्यावे लागतील. शेºयासाठी वापरल्या जाणाºया इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्दच त्यासाठी दिले आहेत. त्याची काही उदाहरणे : अ‍ॅज अ स्पेशल केस (खास बाब म्हणून), अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव अप्रुव्हल मे बी आॅब्टेंड (प्रशासकीय मान्यता मिळविण्यात यावी), अप्रुव्हड अ‍ॅज प्रपोज्ड (प्रस्तावित केल्याप्रमाणे मान्य).काय आहे आदेशात?- सरकारी योजनांची नावे मराठीतच असली पाहिजेत.- ज्येष्ठ अधिकाºयांनी भाषण करताना वा बैठकीत मराठीतच बोलले पाहिजे.- अभ्यास गट, समित्यांनी त्यांचे अहवाल मराठीतूनच द्यावेत.एच. एन. नव्हे, ह. ना. आपटे लिहानावे मराठीत लिहिताना इंग्रजी आद्याक्षरांचे भाषांतर न करता ते मराठीतूनच लिहावे. एच. एन. न लिहिता ह. ना. आपटे असे लिहावे, हे उदाहरण दिले आहे.वांद्रे व शीव असेच लिहारेल्वे स्थानके, भाग वा गावांची नावे यांचा उल्लेख सरकारी कागदपत्रांत मराठीतच असावा. बांद्रा नव्हे, तर वांद्रे आणि सायन नव्हे, तर शीव असेच लिहावे.

टॅग्स :marathiमराठीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार