शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने बढत्यांमधील आरक्षण ठेवले कायम

By यदू जोशी | Updated: September 2, 2017 06:13 IST

सर्वोच्च न्यायालयात केल्या जाणा-या अपिलावरील अंतिम निकालाच्या अधीन राहून मागासवर्गीय कर्मचारी, अधिका-यांचे बढत्यांमधील आरक्षण कायम ठेवण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली असून त्यामुळे बढत्यांचे आदेश काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात केल्या जाणा-या अपिलावरील अंतिम निकालाच्या अधीन राहून मागासवर्गीय कर्मचारी, अधिका-यांचे बढत्यांमधील आरक्षण कायम ठेवण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली असून त्यामुळे बढत्यांचे आदेश काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.मुंबई उच्च न्यायालयाने ४ आॅगस्ट २०१७ रोजी शासकीय कर्मचाºयांच्या बढत्यांमधील आरक्षण रद्द केले होते. तथापि, राज्य सरकारला या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाता यावे यासाठी उच्च न्यायालयाने आपला हा आदेश १२ आठवठ्यांसाठी तहकूब ठेवला आहे.उच्च न्यायालयाने आपल्याच आदेशाला तहकुबी दिलेली असल्याने बढत्यांमधील आरक्षणावर कुठलीही स्थगिती नाही, अशी भूमिका सामान्य प्रशासन विभागाने घेतली आहे. या संदर्भातील निकालाच्या अधीन राहून आम्ही बढत्या देत आहोत. सामान्य प्रशासनचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यास दुजोरा दिला.या विषयाबाबत विविध विभागांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. काही विभाग आरक्षणानुसार बढत्यांचे प्रस्ताव देत आहेत तर काहींनी ते रोखले आहेत. काहींनी सामान्य प्रशासन विभागाचा सल्ला मागितला आहे. पण ३१ आॅगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभागानेच आरक्षणाच्या आधारे बढत्यांचे आदेश काढले. सहकार, महसूल, गृह, ग्रामविकास व जलसंधारण विभागातील मागासवर्गीय पाच कक्ष अधिकाºयांना अवर सचिव म्हणून बढती देण्यात आली.समाधान आणि नाराजी असा परस्परविरोधी सूरराज्य शासनाच्या या भूमिकेवर कर्मचारी, अधिकाºयांमध्ये समाधान आणि नाराजी असा परस्परविरोधी सूर आहेत. दोन्ही बाजूच्या अधिकाºयांच्या शिष्टमंडळांनी आपापाली भूमिका वरिष्ठांकडे प्रत्यक्ष भेटून व निवेदनांद्वारे मांडली आहे. मंत्रालयात हा सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. उच्च न्यायालयाने निकाल दिलेला असताना आणि राज्य शासन अद्याप सर्वोच्च न्यायालयात गेलेले नसताना आरक्षण कायम कसे काय ठेवले जाऊ शकते, असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. तर, उच्च न्यायालयाने आपल्याच आदेशाला स्थगिती दिलेली असल्याने बढत्यांमधील आरक्षण कायम आहे आणि उच्च न्यायालयानेही तसे स्पष्ट केलेले होते, असे समर्थकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCourtन्यायालय