शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सरकार दरबारी मराठीची गळचेपी, मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतल्या विभागांनाही मराठीचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 02:12 IST

मंत्रालयातील विभागांनी सर्व कामकाज मराठीत करावे, कर्मचाºयांनी मोबाइलवरही अधिकाधिक मराठीचा वापर करावा, असे परिपत्रक काढणा-या महाराष्ट्र शासनालाच मराठीचे वावडे आहे.

मुंबई : मंत्रालयातील विभागांनी सर्व कामकाज मराठीत करावे, कर्मचाºयांनी मोबाइलवरही अधिकाधिक मराठीचा वापर करावा, असे परिपत्रक काढणा-या महाराष्ट्र शासनालाच मराठीचे वावडे आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाºया एकूण ३७ विभागांमध्ये मराठीची गळचेपी होत आहे. या विभागांच्या तब्बल १७५ संकेतस्थळांपैकी केवळ ८७ संकेतस्थळांवरच मराठी भाषा समाविष्ट करण्यात आली आहे. उर्वरित संकेतस्थळांसाठी मराठीची गळचेपी केली जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, गृह, विधि व न्याय, बंदरे, माहिती व जनसंपर्क असे विभाग आहेत. त्यापैकी सामान्य प्रशासन विभागांतर्गत १२ विभाग आहेत. यातील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ या तीन विभागांचे संकेतस्थळ हे केवळ इंग्रजी भाषेत आहे. मुख्य माहिती आयुक्त आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग या संकेतस्थळांचे मुखपृष्ठ मराठीत असून संकेतस्थळावरील इतर माहिती इंग्रजी भाषेत आहे. राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग या विभागाचे संकेतस्थळ हे हिंदी भाषेतही आहे. राजभाषा अधिनियमानुसार शासकीय कामकाजाची भाषा मराठी असताना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवर या विभागाची माहिती हिंदी भाषेत उपलब्ध करण्याची काहीच आवश्यकता नव्हती, तरीही हिंदीचा आग्रह का, असा सवालही अनेक तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. गृह विभागांतर्गत एकूण ७ विभाग आहेत. यापैकी महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण, मुंबई पोलीस, महाराष्ट्र राज्य पोलीस हाऊसिंग अँड वेल्फेअर कॉर्पोरेशन या विभागांची संकेतस्थळे केवळ इंग्रजी भाषेत आहेत.सार्वजनिक उपक्रमांची माहिती इंग्रजीतचअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वित्त, नियोजन आणि वने असे तीन विभाग आहेत. या विभागांतर्गत १२ उपविभाग आहेत. त्यापैकी मूल्यवर्धित कर विक्रीकर विभाग, कोषवाहिनी, अर्थसंकल्प, वितरण व सनियंत्रण प्रणाली (बीईएमएस), शासकीय जमा लेखा प्रणाली (जीआरएएस), निवृत्ती वेतन वाहिनी आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती अशा ६ विभागांची संकेतस्थळे ही केवळ इंग्रजी भाषेत आहेत. तर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या अखत्यारीत असलेल्या गृहनिर्माण विभागांतर्गत ५ विभाग आहेत. त्यापैकी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित या विभागांची संकेतस्थळे ही केवळ इंग्रजी भाषेत आहेत.५५ संकेतस्थळांवर फक्त इंग्रजीचा वापरराज्य शासनाच्या १७५ संकेतस्थळांपैकी ८७ संकेतस्थळांवर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तर ५५ संकेतस्थळांवर केवळ इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. १९ संकतस्थळे अशी आहेत, ज्यांचे केवळ मुखपृष्ट मराठी आणि उर्वरीत संकेतस्थळांवर इंग्रजीचा वापर केला जातो. ३ संकेतस्थळांवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचा वापर केला जातो. तसेच ११ संकेतस्थळे अशी आहेत; त्याचा उल्लेख सरकार दरबारी आहे पण प्रत्यक्षात ती इंटरनेटवर नाहीत.भाषांतरात त्रुटीनगर विकास विभागांतर्गत ५ विभाग आहेत. यापैकी महाराष्ट्र अग्निशमन सेवा या विभागाच्या इंग्रजी संकेतस्थळावर ६ी २ी१५ी ३ङ्म २ं५ी असे लिहिले आहे. या वाक्याचे मराठी भाषांतर ‘आम्ही जतन सर्व्ह’ असे करण्यात आले आहे.केवळ मुखपृष्ठ मराठीसांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत. त्यांच्याकडे शिक्षण, क्रीडा, युवक कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्याक विकास असे विभाग आहेत. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागांतर्गत ६ विभाग आहेत. यापैकी शालेय शिक्षण विभाग संकेतस्थळाचे केवळ मुखपृष्ठ मराठीत आहे. त्यावरील कोणत्याही टॅबवर क्लिक केले तर पुढील माहिती इंग्रजी भाषेतच मिळते. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या तंत्रशिक्षण संचालनालय, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ या चार विभागांची संकेतस्थळे ही केवळ इंग्रजी भाषेत आहेत आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ हे संकेतस्थळ मराठीसह हिंदी भाषेत आहे.जे राज्य शासन सर्व विभागांना मराठीचा आग्रह धरण्याचे, मराठीचा अधिक वापर करण्याचे आदेश देत आहे. त्या शासनालाच मराठीचे वावडे आहे. राजभाषा अधिनियमाला छेद देत अनेक संकेतस्थळे हिंदी भाषेतही आहेत. त्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. तसेच सरकारने सर्व संकेतस्थळांवर मराठी भाषेचा वापर करायला हवा, यासाठी मराठी अभ्यास केंद्रातर्फे मागणी करणार आहोत. परंतु त्याअगोदर अशी मागणी करण्याची वेळ का येत आहे, हे तपासणे गरजेचे आहे. राज्य शासनाला मराठीचे वावडे का, शासन दरबारी मराठीची गळाचेपी का केली जात आहे, याची उत्तरे शासनाने द्यायला हवीत.- आनंद भंडारे, समन्वयक, मराठी अभ्यास केंद्र

टॅग्स :Marathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018marathiमराठी